Home » क्राईम » मराठी शाळा परिसर बंनला दारुड्यांचा अड्डा किशोरवयीन मुलांकडून सर्रासपणे शस्त्रांचा वापर ; जिल्हा परिषद मराठी शाळेच्या भिंती जवळ टपऱ्यांच्या पाठीमागे युवकाला मस्करी मध्ये छातीत लागली गोळी युवक गंभीर जखमी

मराठी शाळा परिसर बंनला दारुड्यांचा अड्डा किशोरवयीन मुलांकडून सर्रासपणे शस्त्रांचा वापर ; जिल्हा परिषद मराठी शाळेच्या भिंती जवळ टपऱ्यांच्या पाठीमागे युवकाला मस्करी मध्ये छातीत लागली गोळी युवक गंभीर जखमी

  1. मराठी शाळा परिसर बंनला दारुड्यांचा अड्डा किशोरवयीन मुलांकडून सर्रासपणे शस्त्रांचा वापर ; जिल्हा परिषद मराठी शाळेच्या भिंती जवळ टपऱ्यांच्या पाठीमागे युवकाला मस्करी मध्ये छातीत लागली गोळी युवक गंभीर जखमी

    एरंडोल प्रतिनिधी  –  एरंडोलतालुक्यातील ग्रामीण भागात किशोरवयीन युवकांमध्ये सिनेमा नाटके पासुन हिरो व खलनायकांमध्ये जसे दाखवतात त्याप्रमाणे व्यसनाधीनता वाढुन व शस्त्रांचा सरासपणे वापर वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे अशीच घटना कढोली येथे जिल्हा परिषद शाळेच्या संरक्षण भिंतीला लागून टपऱ्यांच्या पाठीमागे मस्करी मस्करीत गोळीबाराची घटना घडली यात एक युवक सोनू सुभाष बडगुजर याला मस्करी मध्ये छातीजवळ बंदूक समोर धरत असताना बंदुकीतून अचानक गोडी सुटल्याने घोडी युवकाच्या छातीत जाऊन बसली त्यामुळे युवक गंभीर जख्मी झाल्याने युवकाला जळगाव येथे खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे
    तसेच ग्रामीण भागात युवक व्यसनाच्या आहारी जात असल्याने हे युवक रात्री दोन ते तीन वाजेपर्यंत मराठी शाळा परिसरात दारू पीत असतात तसेच सरासपणे शस्त्रांचा ही वापर करत असतात याकडे मात्र पोलीस प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष होत असल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे मराठी शाळा परिसरात दारुड्यांचा नेहमी रात्रभर धिंगाणा सुरू असल्याने समोरील रहिवाशी ग्रामस्थ ही वैतागली आहेत कोणीही तक्रारी करण्यात धजावत नसल्याचे बोलले जात आहे संबंधित पोलीस प्रशासनाने शस्त्रे जप्त करून कारवाईची मागणी करण्यात येत आहे
    यावेळी जिल्हा परिषद शाळे लगत टपऱ्यांच्या पाठीमागे ही घटना सायंकाळी तीन ते पाच वाजेच्या दरम्यान घडल्याचे बोलले जात आहे तसेच एरंडोल पोलीस व जळगाव पोलिसांचे पथक दाखल झाले असून त्या ठिकाणी पंचनामा चे काम रात्री उशिरापर्यंत सुरू असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले

    पंधरा ते वीस दिवसांपूर्वीच कढोली जवळच खेडी खुर्द आहे ते दोन गटात हाणामारी होऊन सर्रासपणे शस्त्रांचा वापर करण्यात आला होता यामध्ये दोन्ही कडील तरुण युवक गंभीर जखमी झाले होते त्यामध्ये त्यांना खाजगी सरकारी रुग्णालयात उपचार करूण सुट्टी देण्यात आली मात्र तरीही संबंधित विभागाकडून शस्त्र जप्तीची कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये संतप्त भावना व्यक्त केल्या जात आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

HUF Registration Services In India
संबंधित बातम्या