- महाराष्ट्र,मध्यप्रदेश च्या चोरवड नाक्यावर वाहनासह 22 लाखांचा गुटखा जप्त : रावेर पोलिसांची मोठी कारवाई
गुन्हे शोध पथकाची मोठी कामगिरीप्रतिनिधी / रावेरमध्यप्रदेशातून महाराष्ट्रात विक्रीसाठी येणारा गुटका पोलिसांच्या गस्ती पथकाने चोरवड सीमा तपासणी नाक्यावर बुधवारी मध्यरात्री पकडला आहे. यात 8 लाख रुपयांच्या चारचाकी वाहनासह 14 लाख रुपयांचा गुटका असा एकूण 22 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, सहाय्यक पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंग यांनी पोलीस निरीक्षक डॉ विशाल जयस्वाल यांना अवैध गुटका वाहतुकीवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. पोलीस निरीक्षक डॉ जयस्वाल यांनी रात्री गस्तीवर असलेल्या पोलीस पथकातील उप निरीक्षक अंकुश जाधव, पोलीस कर्मचारी विशाल पाटील, रवींद्र भांबरे यांना चोरवड नाक्यावरून रावेरकडे गुटक्याची वाहतूक करणाऱ्या वाहनाची माहिती देऊन कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार नाकाबंदी सुरु असतांना रात्री 1:50 वाजता महिंद्रा बोलेरो हे चारचाकी वाहन येताना दिसले. हे वाहन थांबवून चौकशी केली असता त्यात 14 लाख 1हजार 160 रुपयांचा महाराष्ट्रात विक्रीसाठी बंदी असलेला विमल कंपनीचा गुटका आढळून आला. याबाबत पोलिसांनी चौकशी केली असता बऱ्हाणपूर येथील एका गोडावून मधून हा गुटका दिल्याची माहिती वाहन चालकाने दिली. याप्रकारणी वाहनचालक रिजवान शेख रउफ व त्याचा साथीदार शेख शोएब शेख शरीफ दोघे रा छत्री चौक, पठाण वाडी फैजपूर ता यावल यांच्या विरुद्ध पोलीस कर्मचारी संभाजी बिजागरे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.