Home » क्राईम » *मित्राच्या बहिणीच्या हळदीच्या कार्यक्रमाला जातांना कार पलटी होऊन चोपड्याचा एक युवक जागीच ठार…….!*

*मित्राच्या बहिणीच्या हळदीच्या कार्यक्रमाला जातांना कार पलटी होऊन चोपड्याचा एक युवक जागीच ठार…….!*

  1. *मित्राच्या बहिणीच्या हळदीच्या कार्यक्रमाला जातांना कार पलटी होऊन चोपड्याचा एक युवक जागीच ठार…….!*

    एरंडोल प्रतिनिधी  – बिलवाडी ता.जळगांव येथे मित्राच्या बहिणीच्या हळदीच्या कार्यक्रमाला भरधाव वेगाने कारने जातांना कार पुलाच्या भिंतीस धडकल्याने पुलाच्या खाली जाऊन पलटी झाली.त्यात दिपक अरूण मराठे,रा.मल्हारपुरा, चोपडा हा युवक जागीच ठार झाला.ही दुर्घटना उमरदे गावानजीक पुलाच्या वळणावर ८ मे २०२५ रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास घडली.
    पारस संतोष महाजन,रा.चोपडा, दिपक अरूण मराठे व मोहीत भिकन नाथबुवा,रा.धरणगांव हे तिघे त्यांचा मित्र चेतन वानखेडे यांच्या बहिणीच्या हळदीच्या कार्यक्रमासाठी बिलवाडी,ता.जळगांव येथे एम एच १२ ए एन ५३४६ क्रमांकाच्या स्विफ्ट डिझायर कारने जात असतांना एरंडोल म्हसावद रस्त्यावर उमरदे गावानजीक पुलाच्या वळणावर पुलाच्या भिंतीस कारने जोरदार धडक दिल्याने कार पुलाच्या खाली उतरून पलटी झाली.त्यात दिपक अरूण मराठे हा युवक जागीच ठार झाला.तर इतर सोबत असलेले किरकोळ जखमी झाले.
    हा अपघात घडला त्यावेळी उमरदे गावातील लोक मदतीसाठी घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी मदत कार्य केले.याप्रकरणी एरंडोल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

HUF Registration Services In India
मनोरंजन
संबंधित बातम्या