Home » सरकारी » राष्ट्रीय महामार्ग ५३ वर एरंडोल व पारोळा परिसरात अंडरपास (VUP) ला ८० कोटीची मंजुरी -खा.स्मिताताई वाघ*

राष्ट्रीय महामार्ग ५३ वर एरंडोल व पारोळा परिसरात अंडरपास (VUP) ला ८० कोटीची मंजुरी -खा.स्मिताताई वाघ*

  1. *राष्ट्रीय महामार्ग ५३ वर एरंडोल व पारोळा परिसरात अंडरपास (VUP) ला ८० कोटीची मंजुरी -खा.स्मिताताई वाघ*

    प्रतिनिधी एरंडोल – राष्ट्रीय महामार्ग क्र. ५३ (NH-53) वरील तरसोद ते फागणे या विभागात एरंडोल शहरातील कासोदा रस्ता तसेच पारोळा बायपासवरील धरणगाव चौफुली येथे वेहिकल अंडरपास (VUP) बांधण्यास ८० कोटीची मंजुरी मिळाली आहे. जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या खासदार स्मिताताई उदय वाघ यांच्या सातत्यपूर्ण आणि ठाम पाठपुराव्यामुळे हा महत्त्वाचा विकास प्रकल्प मार्गी लागला आहे.गेल्या काही वर्षांत या ठिकाणी वारंवार अपघात घडत असल्याने स्थानिक नागरिक, वाहनचालक व शेतकरी यांच्याकडून तक्रारी येत होत्या. या पार्श्वभूमीवर खासदार स्मिताताई वाघ यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीनजी गडकरी तसेच National Highways Authority of India (NHAI) चे वरिष्ठ अधिकारी, केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालय व संबंधित विभागांकडे लेखी निवेदने, चर्चा आणि प्रत्यक्ष पाठपुरावा केला होता.

    सध्या तरसोद–फागणे NH-53 या महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम मे. फागणे–तरसोद कॉरिडॉर प्रा. लि. यांच्यामार्फत प्रगतीपथावर असून, याच अंतर्गत Non Regular Civil Works (NRCW) योजनेतून एरंडोलच्या कासोदा रस्त्यावर आणि पारोळा बायपासवरील धरणगाव चौफुली येथे VUP उभारणीस मान्यता देण्यात आली आहे.या प्रकल्पामुळे वाहतूक अधिक सुरळीत होणार असून अपघातांचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी होईल. स्थानिक व्यापार, शेती उत्पादनांची ने-आण तसेच दैनंदिन प्रवास अधिक सुरक्षित व सोयीस्कर होऊन परिसराच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे.

    देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीनजी गडकरी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि जलसंपदा मंत्री गिरीशजी महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांतून जळगाव मतदारसंघातील रस्ते व पायाभूत सुविधांच्या विकासाला गती मिळत असल्याचे खासदार स्मिताताई वाघ यांनी नमूद केले. जनतेच्या समस्या सोडवणे व विकासकामांना प्राधान्य देणे हे प्रयत्न यापुढेही सुरूच राहतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

HUF Registration Services In India
मनोरंजन
संबंधित बातम्या