Home » क्राईम » वाचन हाच माणसाचे जीवन समृद्धीचा मुळ पाया होय, जीवनाच्या सार्थक ते साठी वाचन करा………नगर वाचनालय एरंडोल चिटणीस रविंद्र लाळगे यांचे आवाहन.

वाचन हाच माणसाचे जीवन समृद्धीचा मुळ पाया होय, जीवनाच्या सार्थक ते साठी वाचन करा………नगर वाचनालय एरंडोल चिटणीस रविंद्र लाळगे यांचे आवाहन.

  1. वाचन हाच माणसाचे जीवन समृद्धीचा मुळ पाया होय,
    जीवनाच्या सार्थक ते साठी वाचन करा………नगर वाचनालय एरंडोल चिटणीस रविंद्र लाळगे यांचे आवाहन.

    एरंडोल प्रतिनिधी – येथील दि.15.10.2025
    भुतपुर्व राष्ट्रपती डॉक्टर अब्दुल कलाम यांचा
    जन्मदिवस एरंडोल शहर नगर वाचनालयात वाचन- प्रेरणा दिवस म्हणून साजरा करतांना एक उपक्रम राबविण्यात येऊन वाचकांचा सन्मान करून साजरा करण्यात आला.
    कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वाचनालयाचे अध्यक्ष जगदिश ठाकूर होते.या वेळी नियमित वाचक प्रसिद्ध डॉक्टर के ए बोहरी, शरद चौधरी, दगडू सोनार,सुरेश खुरे,उद्योजक दिनेशजी काबरा,प्रेमसिंग ठाकूर, रोकडे मधुकर, नरेंद्र पाटील, तुकाराम कुदोळ,डॉक्टर सुहास अग्नि होत्री ,योगेश महाले यांना सन्मानित करण्यात आले.
    या मान्यवरांचा सन्मान करणे हे आमचे भाग्य समजतो.वाचकांमुळेच खरे अर्थाने वाचन संस्कृती जिवंत आहे, ही संस्कृती टिकवणे आवश्यक ती वाढविणेसाठी विशेष प्रयत्न करु असे प्रास्ताविकात जगदिश जी ठाकूर वाचनालयाचे अध्यक्ष यांनी नमूद केले.कविवर्य तथा कार्याध्यक्ष प्रा. वा ना आंधळे सर नगर वाचनालय एरंडोल यांनी वाचनातून मनुष्य खरा श्रीमंत होतो,श्रीमंत माणसानेच वाचन करावे असे नाही मात्र वाचनातून माणूस हा श्रीमंत ‌होईल हे मात्र निश्चित च खरे आहे.आणि ही श्रीमंती आपले अस्तित्व कायम टिकविण्याचे काम करेल हे निर्विवाद सत्य आहे त्यामुळे क्षणोक्षणी ज्ञान प्राप्तीसाठी वाचन करा असे आपल्या भाषणातून प्रतिपादीत केले.तर नगर वाचनालय चिटणीस रविंद्र जी लाळगे यांनी अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचनाची प्रेरणा घेऊन आपले जीवन समृद्ध करावे असे आवाहन केले .वाचन हाच जीवन समृद्धीचा खरा मार्ग असून “वाचाल तर वाचाल’ हा मंत्र अंगिकारावा अशी अपेक्षा तरूण पिढी कडून व्यक्त केली. व नगर वाचनालय एरंडोल ही संस्था वैभवशाली व्हावी यासाठी वाचनाबरोबरच मन व धनाचे ही योगदान द्यावे असे आवाहन केले. या वेळी वाचकांतून उत्तम विचार व्यक्त करतांना मा.डॅाक्टर ए के बोहरी म्हणाले की, वाचनामुळे मी कसा उत्तम व्यक्ती घडलो हे व्यक्त केले .विशेष म्हणजे बालाजी उद्योग समूहाचे आधारस्तंभ दिनेश जी काबरे यांच्या शी दिलखुलास असा संवाद साधतांना काबरे यांनी वाचनातून खरा आनंद मिळतो अर्थात जीवनाच्या उत्तरार्धातील खरा मित्र पुस्तके आहेत असे सांगून एरंडोल वाचनालय हे उत्तम समाज घडवण्यासाठी प्रयत्नशील आहे असे गौरवोद्गार काढले. वाचकांसाठी ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन यावेळी नगरवाचनालयामार्फत करण्यात आले .मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन व अब्दुल कलाम यांची प्रतिमा पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले आहे .
    कार्यक्रमाचे संचलन संचालक तथा पत्रकार प्रविण महाजन यानी तर आभार संचालक परेश बिर्ला यांनी मानले. वाचनालयाचे संचालक डॅाक्टर पळशीकर, गूरूदास ‌पाटील,सहचिटणीस‌ संतोष वंजारी व कर्मचारी ग्रंथपाल देवेंद्र वंजारी, अग्निहोत्री, गोकुळ मोरे व वाचक बहुसंख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

HUF Registration Services In India
मनोरंजन
संबंधित बातम्या