वेगाने जाणाऱ्या टॅंकरची दुकानास जबर धडक चालकासह पादचारी यूवक ठार ,एरंडोल येथील भल्या पहाटेची घटना … गतिरोधक व बंद लाईट यांनी घेतले बळी !
शकील अ. बागवान
प्रतिनिधी — एरंडोल येथे जळगाव कडून भरधाव वेगाने येणाऱ्या सीमेंट चा टँकरने महामार्गा लगतच्या आसारिच्या दुकानास जबर धडक दिली ही या दुर्घटनेत टँकर चालक फुलचंद वय २६ वर्षे रा चिलूला तालुका हैदरगड जिल्हा बाराबंकी हा जागीच ठार झाला तर पादचारी शकील नबी बागवान वय ३४ वर्षे रा एरंडोल याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला अमळनेर नाक्या नजीक असलेल्या राष्ट्रीय महामार्गा वरील गती रोधकाजवळ चालकाचे वेगावर नियंत्रण न राहिल्याने दिनांक २६ नोव्हेंबर २०२४ रोजी भल्या पहाटे २ वाजेचे सुमारास सदर अपघात घडला दरम्यान अमळनेर नाका परिसरात महामार्गावरील पथदिवे बंद असल्या कारणाने या ठिकाणी या आधी देखील अनेक अपघात होऊन निष्पाप लोकांचे बळी गेले आहेत या शिवाय गतिरोधकाबाबत फलक लावलेला नाही अशा तक्रारी पुढे येत आहे
या बाबत समजलेली माहिती अशी की एम एच १५ जे सी १९९५
या क्रमांकाचा सिमेंटचा टँकर भरधाव वेगाने राष्ट्रीय महामार्गाने जात असताना गतिरोधकावर चालकाचा ताबा सुटल्याने थेट आसरीच्या दुकानात घुसला त्यात चालक हा जागीच ठार झाला शकील बागवान हा व त्याची आई दोघ जण रात्री उशीरा परगावावरुन परत आल्यावर रस्त्याच्या बाजूने पाई चालत असताना टँकरच्या मागील चाकात आला त्यामुळे त्याचे दोघ पाय निकामी झाले जळगाव येथे खासगी दवाखान्यात उपचार घेत असताना त्याचे निधन झाले दरम्यान त्याची आई सुदैवाने बालबाल बचावली
घटनां स्थळी सकाळी मोठा जनसमुदाय जमला असता त्यांनी महामार्ग प्राधिकरणाच्या उदासींतेबाबत तीव्र संताप व्यक्त केला
या बाबत एरंडोल पोलिस स्टेशनला अपघाताची नोंद करण्यात आली
शकील अ नबी बागवान हे एरंडोल येथील अँग्लो उर्दू हायस्कूलचे संचालक होते ते त्यांच्या भावाच्या लग्नासाठी कपड्यांसह इतर वस्तूंची खरेदी करण्यासाठी आई सोबत मालेगाव येथे गेले होते तेथून ते व त्यांची लक्झरी बस ने रात्री उशिरा एरंडोलला पोहचले घरी परत जात असताना अपघातरुपी काळाने त्यांच्यावर घाला घातला