Home » शैक्षणिक » *शास्त्री फार्मसी महाविद्यालयात सायबर क्राईम विषयावर कार्यशाळा संपन्न*

*शास्त्री फार्मसी महाविद्यालयात सायबर क्राईम विषयावर कार्यशाळा संपन्न*

  1. *शास्त्री फार्मसी महाविद्यालयात सायबर क्राईम विषयावर कार्यशाळा संपन्न*

    एरंडोल प्रतिनिधी – येथे
    शास्त्री फार्मसी महाविद्यालयात विद्यार्थ्यांमध्ये आज रोजी सायबर सुरक्षिततेबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने सायबर क्राईम या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत एरंडोल पोलीस ठाण्यातील श्री. ललित नारखेडे व श्री. दीपक राजपूत यांनी विद्यार्थ्यांना मौल्यवान मार्गदर्शन केले.

    कार्यशाळेदरम्यान सायबर गुन्ह्यांचे वाढते प्रमाण, ऑनलाइन आर्थिक फसवणूक, बनावट लिंक, सोशल मीडियाचा गैरवापर, तसेच ओटीपी व पासवर्ड सुरक्षित ठेवण्याचे महत्त्व याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. प्रत्यक्ष घडलेल्या घटनांची उदाहरणे देत सायबर गुन्हे कसे घडतात व त्यापासून कसा बचाव करता येईल, याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.

    सायबर गुन्ह्याची शंका आल्यास तात्काळ १९३० या हेल्पलाईनवर तक्रार नोंदवावी तसेच cybercrime.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन तक्रार कशी करावी, याची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. मोबाईल, ई-मेल व सोशल मीडियाचा वापर करताना आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

    कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय शास्त्री व सचिव सौ. रूपा शास्त्री उपस्थित होते. डिजिटल युगात सायबर सुरक्षेचे महत्त्व अधोरेखित करत अशा कार्यशाळा विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त असल्याचे त्यांनी आपल्या मनोगतात सांगितले.

    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अनुप कुलकर्णी यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. सुमेश पाटील यांनी केले. प्राध्यापक, कर्मचारी व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. या कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांमध्ये सायबर क्राईमविषयी जागरूकता वाढल्याचे दिसून आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

HUF Registration Services In India
मनोरंजन
संबंधित बातम्या