- *शास्त्री फार्मसी मार्फत घेण्यात आलेल्या कॅम्पस इंटरव्ह्यू मध्ये २६ विद्यार्थ्यांची निवड.*
- एरंडोल प्रतिनिधी– येथे दि.27/02/26 रोजी मॅकलॉईड फार्मा कंपनी मार्फत घेण्यात आलेल्या कॅम्पस मुलाखत मध्ये शास्त्री फार्मसी महाविद्यालय एरंडोल येथील तसेच परिसरातील अनेक महाविद्यालयातील पदवी आणि पदविका फार्मसीच्या विद्यार्थ्यांची कॅम्पस मुलाखत मध्ये निवड करण्यात आली. सदरील कॅम्पस इंटरव्ह्यूची मूळ संकल्पना महाविद्यालयाचे उप प्राचार्य डॉ. पराग कुलकर्णी यांची होती. कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी महाविद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष तथा प्राचार्य डॉ. विजय शास्त्री, सचिव सौ रूपा शास्त्री आणि मॅकलॉईड फार्माचे एच. आर. मॅनेजर श्री हिरेन पटेल (दहेज ) तसेच श्री राजकुमार (सारिगम) हे उपस्थित होते. आपल्या मनोगता मध्ये डॉ. विजय शास्त्री यांनी विद्यार्थ्यांच्या जीवनातील संघर्ष, अडचणी आणि करिअर या गोष्टींवर प्रकाश टाकला, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अधिकाधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा महाविद्यालयाचा कटाक्ष असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाची प्रस्तावना महाविद्यालयाचे प्रा. अनुप कुलकर्णी यांनी केली तर मॅकलॉईड फार्माचे एच.आर. मॅनेजर राजकुमार यांनी कंपनी विषयी माहिती दिली.
कॅम्पस मुलाखत मध्ये शास्त्री महाविद्यालयातील १८ आणि इतर महाविद्यालयातील ८ अशी एकूण २६ विद्यार्थ्यांची निवड झाली. या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरिल आनंद स्पष्ट दिसून येत होता. कार्यक्रम प्रसंगी सूत्रसंचालन प्रा. योगेश्वरी लोहार यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. सुमेश पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. राहुल बोरसे, प्रा. जावेद शेख, प्रा. मंगेश पाटील, प्रा. दिग्विजय पाटील, प्रा. चंद्रभान पाटील, प्रा. करण पावरा, प्रा. अनिता वळवी, प्रा. राहुल पाटील तसेच महाविद्यालयातील इतर शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी मेहनत घेतली.
हा कॅम्पस इंटरव्ह्यू विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरला असून महाविद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेची आणि उद्योग क्षेत्राशी असलेल्या दृढ नात्याची साक्ष देणारा ठरला.

