-
*शेतातील झाडाला दोरीचा गळफास घेऊन एकाची आत्महत्या……….!*
एरंडोल प्रतिनिधी – येथील सुक्राम रामदास वाघ वय ४३ वर्षे याने जवखेडे रस्त्यालगतच्या शेतातील झाडाला नायलॉन दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली.ही घटना शनिवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास उघडकीस आली.मृत इसम हा एरंडोल येथील केवडीपूरा भागातील जयराम चत्रू मोरे यांचा शालक आहे.मोरे यांनी एरंडोल पोलीस स्टेशनला खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
हेडकॉन्स्टेबल महेंद्र पाटील हे पुढील तपास करीत आहेत.
