Home » क्राईम » शेतातून जाण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून शिवीगाळ व मारहाण

शेतातून जाण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून शिवीगाळ व मारहाण

 

  • *शेतातून जाण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून शिवीगाळ व मारहा*

एरंडोल ( प्रतिनिधी )
तालुक्यातील रिंगणगाव येथे सविता सुनील शिंदे राहणार विठ्ठल मंदिर,जळगाव ह्या त्यांच्या कुटुंब सदस्यांसोबत शेतमजूर घेऊन त्यांच्या शेतात कापूस वेचणीसाठी जात असताना.आमच्या शेतातून का जातात तुमचा येथून वापर नाही.यावरून वाद व भांडण झाले या भांडणाचे पर्यावसान लाथा बुक्क्यांनी व लाकडी दांडक्याने मारहाण करण्यात झाले.सदर घटना ५ ऑक्टोबर २०२४ रोजी दुपारी तीन वाजता घडली.
सविता सुनील शिंदे या विठ्ठल मंदिर,जळगाव येथे राहत असून त्यांची रिंगणगाव येथे शेती आहे. त्या त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना घेऊन मजुरांसह कापूस वेचण्यासाठी स्वतःच्या शेतात जात असताना त्यांच्या शेजारी असलेल्या शेतात अनिता सुपडू शेळके या स्वतःच्या शेतात आपल्या कुटुंबाच्या सदस्यांसह त्यांच्या शेतात कापूस वेचत होते.सविता शिंदे या शेळके यांच्या शेतातून जात असताना शेळके परिवाराने त्यांना आमच्या शेतातून का जातात? असा जाब विचारला असता वाद होऊन भांडण झाले. त्यातून शेळके परिवाराने बेकायदेशीर जमाव जमवून संगनमत करून शिंदे परिवाराला शिवीगाळ करत लाथा बुक्क्यांनी व लाकडी दांडक्याने मारहाण केली.
या प्रकरणी एरंडोल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हेड कॉन्स्टेबल राजेश पाटील, चंद्रकांत पाटील पुढील तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

HUF Registration Services In India
मनोरंजन
संबंधित बातम्या