महेश निमसटकर प्रतिनिधि —भद्रावती – आयुध निर्माणी चांदा येथे निर्मित होणारा दारुगोळा थल , जल व वायुसेना यांना पुरविला जातो तसेच परदेशातही मोठ्या प्रमाणात पुरवण्यात येते त्यामुळे संपूर्ण भारतात आयुध निर्माणी ही रक्षा उत्पादनात पहिल्या क्रमांकावर असल्याचे मत मुख्य महाप्रबंधक विजयकुमार यांनी व्यक्त केले ते म्युनिशन इंडिया लिमिटेड यांच्या स्थापना दिवसानिमित्त आयुध निर्माणी चांदा येथे आयोजित दोन दिवसीय दारूगोळा प्रदर्शनी कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. उद्द्घाटक म्हणून दिपशिखा समितीचे अध्यक्ष अनिता कुमारी तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. आयुध निर्माणी चांदा नेहमीच दारूगोळा उत्पादनामध्ये लक्ष गाठते त्यामुळे देशासह देशाबाहेर सुद्धा युद्ध सामग्री पुरवठा मोठ्या प्रमाणात वाढला आहे सन २०२३ ते २४मध्ये१६०० करोड रुपयाचे लक्ष प्राप्त केले आहे असे महाप्रबंधक विजयकुमार यांनी सांगितले दोन दिवसीय दारुगोळा प्रदर्शनी दरम्यान ग्राइटेड पिनाका ‘ मिसाईल पिनाका डीपीआयसीए , एडीएम -वन , सेल बॉम्ब ,रॉकेट राऊंड ,अदृश्यमाईन ‘ माईन ए टी १ विविध उत्पादन होणारे दारूगोळा प्रदर्शनी स्थळी ठेवण्यात आला होता ही प्रदर्शनी बघण्याकरता जिल्ह्यातील विद्यालय , महाविद्यालय विद्यार्थी तसेच नागरिकांनी याचा लाभ घेतला