अजीज खान प्रतिनिधी —मोटर सायकल ने ढाणकी ते उमरखेड जात असताना विडूळ पेट्रोल पंम्प जवळील रस्त्याच्या कडेला असलेले सुकलेल जुने झाड अंगावर पडल्याने मोटर सायकल स्वार दोन जण किरकोळ जखमी झाले असून मोठया अपघाताने वाचले आहे.
ढाणकी ते उमरखेड रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडांपैकी काही झाडे अक्षरशः सुकून गेलेली आहेत. ही झाडे ना सावली देतात ना त्यांचा काही उपयोग होत आहे. मग, ही झाडे काढूनच का टाकली जात नाहीत, असा प्रश्न उपस्थित नागरिक करत आहे. ढाणकी ते उमरखेड शेतीचा भाग असल्याने या ठिकाणी रस्त्याच्या कडेला किंवा वाहतुकीस अडथळा येणारी अनेक झाडे आहेत.सुकलेल्या बऱ्याचशा झाडांवर सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी दुर्लक्ष केल्यामुळे या झाडामुळे अपघात होत आहे.
झाडांचे पुनर्रोपण होऊ शकते, पण मनुष्याला पुनर्जीवन मिळू शकत नाही. धोकादायक झाडे रस्त्यातून काढलीच पाहिजेत. प्रशासन जिवांशी खेळताना दिसते आहे एखाद्या वाटसरू चा या अपघाताने जीव जाण्या अगोदर यावर उपाय योजना करण्याची बाब प्रशासनाने गांभीर्याने घेतली पाहिजे.