*हितेशच्या खून प्रकरणी आरोपींना वाढीव तीन दिवसांची पोलीस कोठडी….!*
एरंडोल – रिल्सबाज हितेश पाटील याच्या खून प्रकरणी पोलीस कोठडीत असलेले संशयित आरोपी नामदेव सखाराम पाटील वय ५५ वर्षे, भालचंद्र नामदेव पाटील वय २८ वर्षे व रविंद्र सुरेश पाटील वय २४ वर्षे यांची पोलीस कोठडीची मुदत संपल्यामुळे त्यांना ३ मार्च २०२५ रोजी एरंडोल न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना आणखी ३ दिवसांची पोलीस कोठडी दिली.
दरम्यान हितेशच्या खून प्रकरणी वापरण्यात आलेले दोरी व जे सी बी पोलीसांनी जप्त केले आहेत.