Home » सरकारी » हेलपाटे टळणार, एकाच छताखाली सातबारा अन नमुना 8 मिळणार! छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान: १५ पेक्षा अधिक महसुली सेवा उपलब्ध

हेलपाटे टळणार, एकाच छताखाली सातबारा अन नमुना 8 मिळणार! छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान: १५ पेक्षा अधिक महसुली सेवा उपलब्ध

  1. हेलपाटे टळणार, एकाच छताखाली सातबारा अन नमुना 8 मिळणार! छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान: १५ पेक्षा अधिक महसुली सेवा उपलब्ध

    एरंडोल प्रतिनिधी –
    लोकाभिमुख, कार्यक्षम व गतिमान करण्यासाठी जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानाला ७ मार्चपासून प्रारंभ झाला असून, एकाच छताखाली १५ पेक्षा अधिक महसुली सेवा नागरिकांना मिळणार आहेत.

    सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, विद्यार्थी आणि महिलांच्या महसूल विभागाशी संबंधित तक्रारींचे निराकरण करण्यासाठी राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानाचा रिंगणगाव महसूल मंडळात 14 तारखेला कार्यक्रम घेण्यात येणार आहे. या शिबिरांच्या माध्यमातून नागरिकांना एकाच दिवसात सेवा देण्यात येणार आहेत. यात प्रलंबित आणि विवादग्रस्त फेरफार प्रकरणांचा तत्काळ निपटारा करणे, सातबारामधील चुका दुरुस्त करणे, जात आणि नॉन-क्रिमिलेअर यांसारखी महत्त्वाची प्रमाणपत्रे वितरित करणे यांसह अन्य महसूल योजनांची माहिती नागरिकांना दिली जाणार आहे.

    शेतकऱ्यांनाही मिळणार दिलासा

    प्रलंबित फेरफार, ७/१२ मधील चुकांची दुरुस्ती यांसह अन्य प्रकरणांशी शेतकऱ्यांचा जवळून संबंध येतो. महसूलविषयक प्रकरणांचा निपटारा गावातच होणार असल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

    महसूलविषयक तक्रारींचा जागेवरच निपटारा

    असे आहे अभियानाचे स्वरूप

    महसूल विभागाशी संबंधित तक्रारी, अडचणी व प्रलंबित अर्जाचा शिबिरस्थळीच निपटारा करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. संबंधित अधिकान्यांकडून तक्रारींची तातडीने तपासणी केली जाईल.

    या अभियानांतर्गत गावपातळीवर नागरिकांचे अर्ज स्वीकारणे, त्यांची तपासणी व पडताळणी करणे आणि सेवा देणे ही प्रक्रिया शिबिरातच पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

    एकाच छताखाली मिळणार या सेवा

    या शिबिरामध्ये प्रलंचित फेरफार मधील चुकांची दुरुस्ती, डिजिटल स्वाक्षरीचे ७/१२ व ८-अ उता-यांचे वाटप, उत्पन्न, रहिवासी व जातीचे प्रमाणपत्र, नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्र, अकृषिक (एनए) परवानगी, विद्यार्थ्यांसाठी विविध दाखल्यांचे वाटप

    तुकडेबंदी कायद्याच्या उल्लंघनाशी संबंधित प्रकरणांचा निपटारा, घरांसाठी पट्टे वाटप, ई-मोजणी अर्ज स्वीकारणे, गाव दप्तर अद्ययावत करणे व अन्य महसूलविषयक सेवा मिळणार आहेत.

    छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानाला जिल्ह्याभर झाला आहे. याअंतर्ग महसूल मंडळात नागरिकांना, शेतकरी आणि विद्यार्थांना विविध सेवा दिल्या जात आहेत. नागरिकांनी या अभियानाचा लाभ घ्यावा असे आवाहन

    – तहसीलदार एरंडोल गोपाल पाटील यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

HUF Registration Services In India
मनोरंजन
संबंधित बातम्या