- *१३ वर्षीय तेजसच्या खून प्रकरणी फरार आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने ३६ तासात केले जेरबंद……!*
- एरंडोल – तालुक्यातील रिंगणगांव येथील राजेश गजानन महाजन या १३ वर्षीय मुलाचा गळा चिरून खून केल्याप्रकरणी २ आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या ३६ तासात जेरबंद केले.तर एक आरोपी अजूनही फरार असून त्याच्या शोध घेण्यासाठी पथक रवाना झाले आहे.सुरेश नकल्या बारेला,वय ३४ वर्षे,रा.धोपा,ता.झिरण्या,जि.खरगोण, मध्यप्रदेश व हरदास डेमच्या वास्कूले,वय ३५ वर्षे रा.नांदीया,ताई.भगवानपुरा,जि.खरगोण, मध्यप्रदेश हे आरोपी अटकेत आहेत.तर रिचडीया तुकाराम कोठवले,वय २० वर्षे ,रा.नांदीया,ता.भगवानपूरा,जि.खरगोण मध्यप्रदेश हा फरार आहे.
तेजसचा मृतदेह ज्या ठिकाणी आढळून आला त्यापासून अदमासे ५० फूट अंतरावर तेथे वास्तव्यास असलेले हरदास वास्कले व सुरेश खरते हे कुटुंबासह खूनाची घटना उघडकीस आल्याच्या दिवशी मालकाला न सांगता दुचाकीने मध्यप्रदेशातील नातेवाईकाच्या लग्नाला निघून गेल्यामुळे पोलीसांचा संशय बळावला.आरोपींच्या शोधासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने ३ पथके रवाना केली.तांत्रीक विश्लेषणाच्या मदतीने शोध घेतला असता हरदास वास्कूले यास नाकाबंदी करून अटक करण्यात आली.चौकशी अंती सदर आरोपीने गुन्हा केल्याची कबुली देऊन इतर आरोपींची नावे सांगून माहिती दिली.*गुन्ह्या आधीचे भांडण*
रिंगणगांव येथील आठवडे बाजारात सुरेश खरते व रिचडीया कोठवले हे बाजारात फिरत असताना मयत तेजस यास सुरेश वास्कूले याचा धक्का लागल्या कारणाने सुरेश वास्कूले याने तेजसला शिवीगाळ करून मारहाण करण्यात आली.तेजस विरोध करीत असतांना तिघांनी त्याला मारहाण करून रिचडीया कोठवले याने त्याच्याकडील चाकूने तेजसच्या गळ्यावर वार करून गंभीर जखमी करून ठार केले.उचलून काटेरी झुडूपात फेकून दिले.
या घटनेच्या तपास कामी पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अतिरिक्त पोलीस अधीक्षक कविता नेरकर, अमळनेर विभागाचे पोलीस उपविभागीय अधिकारी विनायक कोते यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक शरद बागल,अक्रम याकुब, हिरालाल पाटील,विजय पाटील, दिपक माळी, रविंद्र पाटील, विष्णू बिऱ्हाडे, संदीप पाटील,प्रविण मांडूळे, राहुल कोळी, किशोर पाटील, पोलीस काॅन्स्टेबल दिपक चवरे,विलेश सोनवणे,पो.ह.दामोदरे यांनी एल सी बीचे पोलीस निरीक्षक संदीप यांच्या मार्गदर्शनाने आरोपींना अटक केली.
आरोपींना एरंडोल पोलीसांच्या स्वाधीन करण्यात आले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड व त्यांचे सहकारी करीत आहेत.