- *एरंडोल तालुका व शहर काँग्रेस कमिटी ची जळगाव जिल्हा निरीक्षक शाम भाऊ उमाळकर यांच्या उपस्थितीत आढावा बैठक संपन्न………!*
एरंडोल प्रतिनिधी – येथे हिमालय मंगल कार्यालयात १२ एप्रिल २०२५ रोजी एरंडोल धरणगाव तालुका व शहर काँग्रेस कमिटीची बैठक जिल्ह्याचे निरीक्षक शाम उमाळकर यांच्या उपस्थितीत पार पडली.अध्यक्षस्थानी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब प्रदीप पवार हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा काँग्रेसचे प्रभारी श्रीमती प्रतिभाताई शिंदे, जिल्ह्याचे मुस्लिम नेते उपमहापौर हाजी करीम सालार,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रतिनिधी विजय महाजन,नेहरू युवा मंडळाचे अध्यक्ष ॲड.सलीम पटेल मोलबी हारुन नववी, जिल्हा डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉ. फरहाज बोहरी,चंद्रकांत पाटील,काँग्रेसचे सरचिटणीस ज्ञानेश्वर कोळी,तालुकाध्यक्ष सुनील पाटील शहराध्यक्ष प्रा.आर. एस. पाटील, धरणगाव तालुकाध्यक्ष व्हि. डि. पाटील,शहर अध्यक्ष अनंत परिहार यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शनपर भाषणे केली.यावेळी जिल्ह्याचे निरीक्षक शाम उमाळकर यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या समस्या व अडचणी जाणून घेतल्या.यावेळी धरणगांव व एरंडोल या दोन्ही तालुका अध्यक्षांनी तालुक्याचा आढावा सादर केला.
आगामी नगरपालिका ,जिल्हा परिषद,पंचायत समिती निवडणुकीच्या तयारी विषयी मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी निरीक्षक श्याम भाऊ उमाळकर यांनी कार्यकर्त्यांचे व पदाधिकाऱ्यांचे विचार चर्चात्मक स्वरूपात ऐकून घेतले.शेवटी अध्यक्षीय भाषणात जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पवार म्हणाले की ” कार्यकर्त्यांनी व नेत्यांनी आपसातील मतभेद विसरून फक्त पक्ष हितासाठीच काम करावे. वैयक्तीक टिपा टिपणी करू नये. जे पक्षासाठी काम करीत नाही त्यांनी बिन बुडाचे आरोप करू नये!”
या आढावा बैठकीचे प्रास्ताविक तालुका अध्यक्ष सुनील पाटील यांनी केले.तर सूत्रसंचालन प्रा .आर. एस. पाटील सर यांनी केले.शेवटी आभार अब्दुल हक देशमुख उपाध्यक्ष तालुका काँग्रेस कमिटी यांनी मानले.
यावेळी तालुका उपाध्यक्ष अब्दुल हक देशमुख,उपाध्यक्ष नारायण मोरे, रवींद्र पाटील, समाधान पाटील, गजानन पाटील, शेख सांडू ,राजेंद्र बाळासाहेब पाटील, सागर पाटील,करीम शेख, आयाज मुजावर, चेतन पाटील,जहांगीर शेख, इमरान सय्यद आदींनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.