- *आस्था महिला मंडळातर्फे नवनिर्वाचित नगरसेविकांचा सत्कार……..!*
एरंडोल प्रतिनिधी – येथे आस्था महिला मंडळातर्फे उपनगराध्यक्षा सुनिता माळी,छाया दाभाडे,पौर्णिमा देवरे,भारती गुर्जर व इतर नगरसेविकांचा सत्कार करण्यात आला.तसेच जिजाऊ ब्रिगेड संघटनेच्या अध्यक्षा शकुंतला अहिरराव,शारदोपासक महिला मंडळाच्या अध्यक्षा रश्मी दंडवते, जयश्री पाटील,प्रतिभा पाटील यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी उपनगराध्यक्षा शकुंतला अहिरराव ह्या होत्या.
आस्था महिला मंडळाच्या अध्यक्षा आरती ठाकूर यांनी प्रमुख अतिथींचे स्वागत व प्रास्ताविक केले.उपसचिव नंदा शुक्ला यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.डाॅ.राखी काबरा,शीतल चौधरी,भारती साळुंखे,पुनम परदेशी, प्रियंका परदेशी,मोना परदेशी, सोनाली तिवारी यांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.शेवटी संगिता सोनवणे यांनी आभारप्रदर्शन केले.
*आस्था महिला मंडळातर्फे नवनिर्वाचित नगरसेविकांचा सत्कार……..!*
संपादक - कैलास महाजन
मनोरंजन
संबंधित बातम्या
