1. *महसूल दिन व महसूल सप्ताह साजरा करण्यासाठी एरंडोल तालुका महसूल विभाग सज्ज, विविध उपक्रम राबविण्याचे नियोजन……..!*

    एरंडोल प्रतिनिधी – येथील तालुकास्तरीय तहसील कार्यालयातर्फे १ ऑगस्ट २०२५ रोजी महसूल दिन साजरा करणे व महसूल सप्ताहाचा शुभारंभ करणे यासाठी प्रशासकीय यंत्रणां सज्ज झाली आहे.या निमित्ताने १ ऑगस्ट २०२५ पासून विशेष शिबिरे उपक्रम व कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.अशी माहिती उपविभागीय अधिकारी मनीषकुमार गायकवाड व तहसीलदार प्रदीप पाटील यांनी दिली आहे.
    महसूल सप्ताहातील कार्यक्रमाचे स्वरूप पुढीलप्रमाणे आहे.
    १ ऑगस्ट २०२५ रोजी महसूल संवर्गातील कार्यरत सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचारी संवाद, उत्कृष्ट अधिकारी व कर्मचारी यांना पुरस्कार वितरण तसेच मान्यवरांच्या हस्ते लाभार्थ्यांना विविध प्रमाणपत्र वितरण.
    २ ऑगस्ट २०२५ रोजी शासकीय जागेवर सन २०११ पुर्वीपासून रहिवासी प्रयोजनार्थ अतिक्रमण असलेल्या कुटुंबापैकी अतिक्रमण नियमानुकुल करण्यास पात्र असलेल्या कुटुंबांना सदर अतिक्रमित जागांचे पट्टे वाटप करणे.
    ३ ऑगस्ट २०२५ रोजी पाणंद व शिवरस्त्यांची मोजणी करून त्यांच्या दुतर्फा वृक्षारोपण करणे.
    ४ ऑगस्ट २०२५ रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान प्रत्येक मंडळ निहाय राबविणे.
    ५ ऑगस्ट २०२५ रोजी विशेष सहाय्य योजनेतील डि.बी.टी.न झालेल्या लाभार्थ्यांना घरभेटी करून डिबीटी करून अनुदानाचे वाटप करणे.
    ६ ऑगस्ट २०२५ रोजी शासकीय जमिनींवरील अतिक्रमणे निष्कासित करणे व त्या अतिक्रमणमुक्त करणे.तसेच शर्तभंग झालेल्या जमीनींबाबत शासन धोरणानुसार नियमानुकूल करणे, सरकार जमा करणे.याबाबत निर्णय घेणे.
    ७ ऑगस्ट २०२५ रोजी एम सॅंड धोरणाची अंमलबजावणी करणे व नवीन मानक कार्यप्रणालीप्रमाणे धोरण पुर्णत्वास नेणे.
    अशाप्रकारे महसूल सप्ताहाचा शुभारंभ १ ऑगस्ट २०२५ रोजी सुरू होऊन महसूल सप्ताहाची सांगता ७ ऑगस्ट २०२५ रोजी होणार आहे.
    याप्रसंगी महसूल नायब तहसीलदार दिलीप पाटील व संजय गांधी निराधार योजनेचे नायब तहसीलदार देवेंद्र भालेराव यांची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

HUF Registration Services In India
मनोरंजन
संबंधित बातम्या