-
*शास्त्री फार्मसी महाविद्यालयात राष्ट्रीय मतदार दिवस साजरा*


एरंडोल प्रतिनिधी:- येथील शास्त्री फाउंडेशन संचलित शास्त्री इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी एरंडोल येथे दिनांक 24 जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यात आला.
सदरील कार्यक्रमासाठी व्यासपीठावर एरंडोल येथील तहसीलदारप्रदिप पाटील,महाविद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष व प्राचार्य डॉ. विजय शास्त्री, सचिव सौ. रूपा शास्त्री, नायब तहसीलदार देवेंद्र भालेराव व महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर पराग कुलकर्णी उपस्थित होते.
कार्यक्रमाची प्रस्तावना वरिष्ठ प्राध्यापक जावेद शेख सर यांनी मांडली. कार्यक्रमाच्या सुरवातीलाच मागील वर्षाच्या मतदार जनजागृती मोहिमेत हिरीरीने भाग घेणार्या विद्यार्थी प्रतिनिधी व स्थानिक बूथ लेवल ऑफिसर यांचे स्मरण पत्र देऊन सन्मान केला. त्यानंतर संकेत ठोसर या विद्यार्थ्याने आपले मनोगत व्यक्त केले व मागील वर्षात महाविद्यालया मार्फत मतदार जनजागृती करण्यासाठी कोणकोणते उपक्रम राबवले त्याचा अहवाल सादर केला.
आपल्या मार्गदर्शनपर भाषणात तहसीलदार प्रदीप पाटील यांनी विद्यार्थ्यांना आपापल्या गावात व शहरात मतदानाविषयी जनजागृती करावी व आपल्या पालकांना देखील समजून सांगावे अशा सूचना दिल्या. त्यापाठोपाठ राष्ट्रीय मतदार दिनाचे औचित्य साधून सर्व विद्यार्थ्यांना लोकशाहीवर निष्ठा ठेवण्याची शपथ देण्यात आली. त्यानंतर अध्यक्षीय भाषणामध्ये प्राचार्य डॉ. विजय शास्त्री यांनी मतदानाचे महत्त्व सांगून आपण सर्व भारतीय आहोत धर्म, भाषा,वंश, जात, पंथ कुठेही मध्ये न येता आपण नि:पक्षपातीपणे मतदानाला सामोरे जाऊन कुठल्याही प्रलोभनाला बळी पडू नये असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. श्रद्धा शिवदे तर आभार प्रदर्शन प्रा. योगेश्वरी लोहार यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील सर्वच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
