- *काही पदाधिकारी घटनेच्या नियमबाह्य जाऊन अध्यक्षांचे अधिकार परस्पर वापरत होते……..!*
*एरंडोल शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष शरद काबरा यांचा सनसनाटी आरोप…..!*एरंडोल प्रतिनिधी – एरंडोल शिक्षण प्रसारक मंडळाचे काही पदाधिकारी माझे अधिकार परस्पर वापरून माझ्या अध्यक्ष पदाला आवाहन देण्याचा प्रयत्न करण्यात आला.ही बाब बेकायदेशीर व घटनेच्या विरोधात असल्याचा आरोप एरंडोल शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष शरद काबरा यांनी केला.
१ जुलै २०२५ रोजी संध्याकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
संस्थेच्या काही जागरूक सभासदांनी संस्थेच्या घटनेचा नियम ८ कलम ३ नुसार विशेष सर्वसाधारण सभेच्या मागणीचे पत्र दिले.त्यावरून १८ मे २०२५ रोजी सभासदांनी सुचविलेल्या विषयावरून सुचनापत्र काढून आयोजन केले.यावेळी संस्थेचे तत्कालीन सचिव श्रीकांत काबरे यांना रजिस्टर पोस्टाद्वारे पत्र देऊन कळविण्यात आले व तोंडी देखील सांगण्यात आले.मात्र त्यांनी सदर बाबीकडे हेतुपुरस्कर दुर्लक्ष करून काही एक प्रतिसाद दिला नाही.याउलट त्यांनी न्यायप्रविष्ट विषय हाताळून खोटी कार्यकारी मंडळाची सभा घेण्याचा प्रयत्न केला.घटनेच्या नियमानुसार अध्यक्षांच्या स्वाक्षरी खेरीज कुठलीही बैठक घेतली जात नाही.परंतु त्यांनी खोटे प्रोसिडींग तयार करून खोटे ठराव करून संस्थेच्या विरोधात काम केले.असा आरोप शरद काबरा यांनी केला आहे.
सदर मंडळीने अनेक वेळा खोटे अर्ज व तक्रारी शिक्षण विभागात केले आहेत.वास्तविक माझ्या नेतृत्वाखाली ४ ऑगस्ट २०२३ रोजी संस्थेची निवडणूक होऊन श्रीकांत कांतीलाल काबरा उपाध्यक्ष, श्रीकांत घनश्याम काबरा सचिव,सागर सुनील मानुधने सहसचिव व विजय सुंदरलाल झंवर,सिध्देश गोकुळ महाजन, संजय शिवनारायण काबरा हे माझ्या नेतृत्वात विजयी झाले होते.संपुर्ण पॅनेल माझ्या नेतृत्वात निवडून आले होते.मात्र ही मंडळी वारंवार संस्थेच्या कामकाजात बाधा आणत होते.व संस्थेच्या हिताविरूध्द कामकाज करीत होते.असाही आरोप शरद काबरा यांनी केला.
यावेळी एरंडोल शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष ॲड. महेश काबरा, सचिव राजु मणियार, सहसचिव धिरज काबरा, स.न. झंवर विद्यालय, पाळधी चेअरमन सुनील झंवर, न्यु इंग्लिश मिडीयम स्कूलचे चेअरमन डॉ. नितीन राठी, रा.ति. काबरे विद्यालयाचे चेअरमन अनिल बिर्ला, कार्यकारी मंडळाचे सदस्य परेश बिर्ला, सतीश परदेशी, ॲड. विलास काबरा, ॲड. कैलास भाटिया, डॉ. नरेंद्र पाटील, अरूण नामदेव पाटील, ॲड. गोविंद झंवर, एस मणियार, ॲड. शरद काळे आदी उपस्थित होते.
या पत्रकार परिषदेत उपस्थित पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांबाबत शरद काबरा यांनी समर्पक माहिती दिली.