Home » क्राईम » महिलेचे तोंड कपड्याने बांधून व हातपाय दोरीने बांधून चोरट्यांनी लंपास केला ३९ हजार ५५० रुपयाचा ऐवज…., रविवारी भल्या पहाटे एरंडोल येथील पुरे भागातील घटना…..

महिलेचे तोंड कपड्याने बांधून व हातपाय दोरीने बांधून चोरट्यांनी लंपास केला ३९ हजार ५५० रुपयाचा ऐवज…., रविवारी भल्या पहाटे एरंडोल येथील पुरे भागातील घटना…..

  1. महिलेचे तोंड कपड्याने बांधून व हातपाय दोरीने बांधून चोरट्यांनी लंपास केला ३९ हजार ५५० रुपयाचा ऐवज….,
    रविवारी भल्या पहाटे एरंडोल येथील पुरे भागातील घटना…..

    एरंडोल प्रतिनिधी:- येथे पुरे भागात जय हिंद चौक परिसरात उषाबाई भिका बडगुजर (वय ५२ वर्ष) या महिलेचे तोंड कपड्याने बांधून व हातपाय दोरीने बांधून तीन ते चार अज्ञात चोरट्यांनी ३८ हजार रुपयाचे सोने चांदीचे दागिने व १५५० रुपये रोकड असा एकूण ३९ हजार ५५० रुपयाचा ऐवज लंपास करून पोबारा केला.
    ही घटना रविवारी भल्या पहाटे येथील जय हिंद चौक परिसरात घडली. याबाबत उषाबाई बडगुजर यांनी एरंडोल पोलीस स्टेशनला तक्रार दिली आहे .
    एरंडोल येथे गांधीपुरा भागातील जय हिंद चौकात उषाबाई भिका बडगुजर ह्या एकट्याच राहतात. त्यांचे पती भिका बडगुजर हे रेल्वे खात्यात भुसावळ डिव्हिजन मध्ये केबिन मॅन या पदावर सेवानिवृत्त झाले होते. त्यांचे फॅमिली पेन्शनवर उषाबाई यांचा उदरनिर्वाह सुरू आहे. त्यांच्या पतीचे दुसरे लग्न सुमनबाई भिका बडगुजर यांच्याशी झाला होता. भिका बडगुजर हे २००३ मध्ये वारले असून त्यांना दोन अपत्य आहेत. ते जळगाव येथे राहतात अरुण भिका बडगुजर हा अधून मधून एरंडोल येथे उषाबाई बडगुजर यांच्या घरी येत होता. तो उषाबाईला ठार मारण्याचे धमकावत होता.
    ६ जुलै रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास जेवण झाल्यावर त्यांच्या घराच्या पुढच्या खोलीमध्ये लोखंडी गेटला कुलूप लावून त्या झोपल्या. सदर कुलपाचे एक चावी त्यांचा सावत्र मुलगा अरुण बडगुजर याच्याकडे होती. ‌ उषाबाई रात्री गाढ झोपत असताना रात्री दोन ते तीन वाजेच्या सुमारास अचानक तीन चार जण घरात शिरले व त्यांनी उषाबाईचे तोंड कपड्याने बांधले व नंतर हात पाय दोरीने बांधले. त्यांनी उषाबाईच्या अंगावर असलेले दागिने व तिच्याकडे असलेली रोकड काढून नेले. याबाबत एरंडोल पोलीस स्टेशनला तक्रार देण्यात आली आहे पुढील तपास एरंडोल पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

HUF Registration Services In India
मनोरंजन
संबंधित बातम्या