- *एरंडोल येथे माॅर्निंग वाॅक करणाऱ्या धरणगांव तहसील कार्यालयातील लिपिकाचा भीषण अपघातात मृत्यू………..!*
एरंडोल – येथे माॅर्निंग वाॅक करणाऱ्या धरणगांव तहसील कार्यालयातील लिपिक शिवाजी रघुनाथ महाजन वय ४२ वर्षे ( मुळ गांव पारोळा हल्ली मुक्काम अष्टविनायक काॅलनी एरंडोल ) यांना मागून भरधाव वेगाने येणाऱ्या डंपरने जोरदार धडक दिली.त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.डंपरच्या धडकेत महाजन जागीच खाली पडले व त्यांच्या अंगावरून डंपरचे चाक गेल्याने ते जागीच मृत्यूमुखी पडले.त्यांचे शरीर छिन्नविछिन्न झाले होते.ही घटना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर येथील बैठक हाॅलच्या समोर सर्व्हिस रोडवर गुरूवारी २० नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ६.४५ वाजेच्या सुमारास घडली.
शिवाजी रघुनाथ महाजन हे धरणगांव तहसील कार्यालयात लिपिक म्हणून कार्यरत होते.ते एरंडोलहून धरणगावला ये जा करायचे.ते त्यांच्या ओळखीच्या मित्रांसोबत दररोज सकाळी पायी फिरायला जात असत.नेहमीप्रमाणे ते एरंडोल पारोळा महामार्गावर फिरायला गेले असता ते पायी चालत असताना मागून भरधाव वेगाने येणाऱ्या एच आर ३८/ए डी – ४१३६ क्रमांकाच्या डंपरने त्यांना धडक दिल्याने ते जागीच खाली पडून त्यांच्या अंगावरून चाक गेल्याने त्यांचे शरीर छिन्नविछिन्न झाले.डंपरचालक हा डंपर सोडून पळून गेला.याप्रकरणी एरंडोल पोलीस स्टेशनला डंपर चालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पुढील तपास करीत आहेत.
