- *शास्त्री इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक भेट*
एरंडोल प्रतिनिधी – शास्त्री इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, पळासदळ, येथील प्रथम वर्ष बी. फार्मसी व डी. फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी बुधवार, दि. 14 जानेवारी 2026 रोजी शैक्षणिक कार्यक्रमांतर्गत ग्रामीण रुग्णालय, होलसेल मेडिसिन डिस्ट्रीब्यूटर व पथोलॉजी लॅबोरेटरी, एरंडोल येथे अभ्यासभेट दिली.
या भेटीचा मुख्य उद्देश ग्रामीण रुग्णालयातील विविध विभागांना भेट देऊन त्यांची कार्यपद्धती प्रत्यक्ष जाणून घेणे हा होता. *ग्रामीण रुग्णालयात* विद्यार्थ्यांना बाह्यरुग्ण विभाग, अंतर्गत रुग्ण विभाग, औषध वितरण विभाग व शल्यचिकित्सा विभागाची सविस्तर माहिती देण्यात आली. या विभागांचे *कार्य व मार्गदर्शन वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपक जाधव* यांनी केले. रुग्णालयातील इतर विभागांची कार्यपद्धती तसेच रुग्णांना औषधांचे वितरण कशा प्रकारे केले जाते, याबाबत विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती देण्यात आली.
यानंतर *डॉ. मुकेश चौधरी* यांनी विद्यार्थ्यांना संसर्गजन्य आजारांबाबत माहिती देऊन त्यापासून बचाव करण्याच्या उपाययोजनांबद्दल सखोल मार्गदर्शन केले.
तसेच *राजमुद्रा होलसेल मेडिसिन डिस्ट्रीब्यूटरचे संचालक श्री. सतीश पाटील* यांनी होलसेल मेडिसिन कशा पद्धतीने रिटेल मेडिकल व्यावसायिकांपर्यंत पोहोचवले जाते, त्यामधील मार्जिन कसे ठरते तसेच औषधांची अल्फाबेटिकली किंवा कंपनीनुसार मांडणी कशी केली जाते, याबाबत माहिती दिली.
*ह्युमन केअर डायग्नोस्टिकचे संचालक डॉ. रोहित ठाकूर* यांनी रक्त, लघवी तसेच इतर पथोलॉजी तपासण्यांचे अहवाल रोगनिदानासाठी किती महत्त्वाचे असतात, हे विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. तसेच *नितीशा मेडिकलचे संचालक श्री. हितेश कापडणे* यांनी किरकोळ औषध विक्री व्यवसायाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
या शैक्षणिक भेटीसाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व प्राचार्य डॉ. विजय शास्त्री तसेच संस्थेच्या सचिव सौ. रूपा शास्त्री यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. भेटीच्या आयोजनासाठी उपप्राचार्य डॉ. पराग कुलकर्णी व प्रा. जावेद शेख यांनी विशेष योगदान दिले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. करण पावरा, प्रा. गायत्री सूर्यवंशी व प्रा. योगेश्वरी लोहार यांनी परिश्रम घेतले.
