- *एरंडोल येथे २३ डिसेंबर रोजी लोकशाही दिनाचे आयोजन…..!*
एरंडोल येथे दिनांक २३ डिसेंबर सोमवार रोजी दुपारी १२ वाजता पंचायत समिती सभागृहात लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले असून या प्रसंगी नागरिकांच्या समस्यांचे निवारण करण्यात येणार आहे. त्यामूळे नागरिकांनी तक्रारी अर्ज व आवश्यक कागद पत्रासह उपस्थित रहावे व लोकशाही दिनाचा लाभ घ्यावा. असे आवाहन तहसीलदार प्रदीप पाटील यांनी केले आहे.
गेल्या महिन्यात लोकशाही दिनी ८ तक्रारी आल्या होत्या.त्या संबंधित विभागाकडे योग्य त्या कार्यवाहीसाठी पाठवण्यात आल्याचे कळवण्यात आले आहे.