*भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील दोन जण ठार..!*
एरंडोल प्रतिनिधी : येथे अमळनेर नाक्यानजिक रविवारी रात्री साडेनऊ ते दहा वाजे दरम्यान राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६वर भरधाव वेगाने जाणाऱ्या टँकर ने एम.एच १९ बी.पी २००३ क्रमांकाच्या दुचाकीस धडक दिली त्यात दुचाकी वरील राजू भिला भोई रा. एरंडोल वय ४६वर्षे हा जागीच ठार झाला तर दिपक रामकृष्ण मोरे रा. शिरसोली हा गंभीर जखमी झाला असता त्यास एरंडोल ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. दोन्हीं मृत इसम नात्याने साडू होते.
- फरार झालेला टँकर पारोळा पोलिस स्टेशन येथे जमा कऱण्यात आला असून अपघातस्थळी संतप्त जमावाने टायर जाळून रास्ता रोको आंदोलन सुरू केले आहे.
प्रकल्प संचालक शिवाजी पवार यांचेवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी आंदोलक माजी नगराध्यक्ष दशरत महाजन, विजय महाजन, रमेश महाजन, राजेंद्र चौधरी, गोरख चौधरी, तसेच गावातील प्रतिष्ठित व नागरिक हजारोंच्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले आहेत रात्री उशिरा पर्यंत पोलिस अधिकारी यांच्या वेतिरिकत्त कोणतेही अधिकारी यांनी घटनस्थळाला भेट दिली नाही त्यामूळे नागरिक संतपत्त झाले होतेदरम्यान,
या अगोदर ही याच ठिकाणी महामार्गक्रॉसिंग वर भिषण अपघात होऊन निष्पाप लोकांचे बळी गेले आहेत.