Home » सामाजिक » *मध्यप्रदेश पाठयपुस्तक निर्मिती मंडळात तज्ज्ञ मार्गदर्शकपदी कवी प्रा.वा. ना.आंधळे यांची नियुक्ती*

*मध्यप्रदेश पाठयपुस्तक निर्मिती मंडळात तज्ज्ञ मार्गदर्शकपदी कवी प्रा.वा. ना.आंधळे यांची नियुक्ती*

  1. *मध्यप्रदेश पाठयपुस्तक निर्मिती मंडळात तज्ज्ञ मार्गदर्शकपदी कवी प्रा.वा. ना.आंधळे यांची नियुक्ती*
  2. एरंडोल प्रतिनिधी  : – येथील सुप्रसिद्ध कवी प्रा.वा. ना.आंधळे यांची मध्यप्रदेश मराठी पाठयपुस्तक निर्मिती मंडळाने मराठी विषय तज्ज्ञ म्हणून नियुक्ती केली असून त्यासंदर्भात पाठयपुस्तक मंडळाचे नियुक्तीपत्र त्यांना काही दिवसांपूर्वीच प्राप्त झाले आहे.तसेच त्यासंदर्भातील मराठी विषयाच्या पाच दिवसीय कार्यशाळेतही त्यांनी आपला सहभाग नोंदवलाय.
    प्रा.आंधळे यांनी वरिष्ठ महाविद्यालयात पस्तीस वर्षे मराठी विषयाचे अध्यापन केले असून चार दशकांपासून काव्यलेखन प्रकाशनात त्यांचा उल्लेखनीय सहभाग आहे.त्यांच्या ‘आई!मला जन्म घेऊ दे!’ या प्रबोधन कवितेची इंग्रजीसह पंचेचाळीस भारतीय प्रमाण व बोलीभाषेत अनुवाद झाले असून कवितेला मोठा जनाधार लाभत कविता सातासमुद्रापार गेल्याचे मोठे यश त्यांच्या नावावर आहे.महाराष्ट्र,गुजराथ व कर्नाटक राज्यातील शालेय अभ्यासक्रमापासून तर विद्यापीठीय अभ्यासक्रमात त्यांच्या कविता समाविष्ठ झालेल्या आहेत.राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद व उदघाटकपद भूषविण्याचा मानही त्यांना मिळाला असून महाराष्ट्रातील चाळीस नामवंत समीक्षकांनी त्यांच्या ‘फर्मान आणि इतर कविता’ या काव्यसंग्रहावर समीक्षा लेखन केलेय.तसेच पन्नास विविध साहित्यकृतींना प्रा.आंधळेंनी प्रस्तावना लेखन केले असून त्या सर्व प्रस्तावना एकत्रित शब्दशिवार या शीर्षकाने पुस्तकरूपात प्रकाशित आहे. अनुवाद क्षेत्रातील त्यांचे योगदान भरीव असून ‘मानवतावादी विचारवंत तथा कवी प्रा.डॉ.म.सु.पगारे यांच्या ‘बा , तथागता!’ या अडीचशे पानी मराठी विशाल कवितेचा अहिराणी बोलीतून अनुवाद यशस्वी करीत त्यावरचा समीक्षा ग्रंथही त्यांनी नुकताच संपादित केलाय.
    अनुष्टुभ,अस्मितांदर्श,शब्दालय,अक्षरवैदर्भी,मिळून साऱ्या जणी,मनोहर,किशोर,उगवाई,किर्लोस्कर,लोकप्रभा,कविताश्री,अधिष्ठान,वसंत या वाङ्मयीन मासिकांसह पाचशे दिवाळी अंकातून त्यांचा नेत्रदीपक काव्यप्रवास आजवर झालाय.मराठी व हिंदी दूरदर्शन मालिकांसाठी शीर्षकगीत लेखनही त्यांनी यशस्वीपणे केलेय.
    साहित्य क्षेत्रातील या भरीव योगदानामुळे त्यांची सदरची नियुक्ती ही संयुक्तिक असून मध्यप्रदेश अभ्यास मंडळाने यथोचित सन्मान केल्याचा आनंद प्रा.आंधळे यांचेसह त्यांच्या चाहत्यांना झालाय.यानियुक्ती प्रित्यर्थ त्यांचे विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केलेय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

HUF Registration Services In India
संबंधित बातम्या