-
आरोग्य दूत विक्की खोकरे यांच्या प्रयत्नामुळे भाग्यश्रीला मिळाले जीवदान.
एरंडोल:- येथील आरोग्य दूत विक्की खोकरे यांनी दुर्धर आजारांनी ग्रासलेल्या अनेक रुग्णांना मृत्यूच्या दाढीतुन त्यांचे प्राण वाचवले आहे. अमळनेर येथील भाग्यश्री वय २४ वर्षे या युवतीच्या हृदयाचा व्हाल जवळपास पंधरा वर्षापासून आजाराने त्रस्त होती. तिला वाचविण्यासाठी विक्की खोकरे हे खऱ्या अर्थाने दुता सारखे धावून गेले. त्यांच्या प्रयत्नांमुळे तिला जीवदान मिळाले. या त्यांच्या कामगिरीबद्दल विक्की खोकरे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
अमळनेर येथील भाग्यश्री जवळपास पंधरा वर्षापासून हृदयाचा व्हाल खराब असल्याने त्रस्त होती. तिची कौटुंबिक स्थिती हालाखीची असल्यामुळे महागडी शस्त्रक्रिया करणे तिच्या क्षमते बाहेरचे होते. तिचे भाऊ कुणाल सरोदे, व रवी सिंगोतिया, यांनी तिच्या उपसारासंबंधी आरोग्य दूत विक्की खोकरे यांना साकडे घातले .खोकरे यांनी शिर्डी येथील साईबाबा हॉस्पिटल मध्ये उपचारार्थ दाखल केले. त्या ठिकाणी तिच्या हृदयाची शस्त्रक्रिया होऊन तिच्यावर उपचार करण्यात आला. दोन आठवड्यात. तिला डिस्चार्ज मिळाला. सध्या ती अमळनेर येथे सुस्थितीत आहे. हृदयरोग तज्ञ डॉक्टर संदीप देवरे, कार्डियाक सर्जन डॉक्टर महेश मिस्त्री यांनी उपचार व शस्त्रक्रिया केली. अशाप्रकारे भाग्यश्रीला दुर्धर आजारातून मुक्त करून तिला जीवन जगण्यासाठी आनंद मिळण्याचे भाग्य लाभले अशा या भाग्यश्री कडून आरोग्य दूत विक्की खोकरे सह डॉक्टरांना धन्यवाद देण्यात आले
आरोग्य दूत विक्की खोकरे यांच्या प्रयत्नामुळे भाग्यश्रीला मिळाले जीवदान.
संपादक - कैलास महाजन
मनोरंजन
संबंधित बातम्या
*एरंडोल येथे साई गजानन संस्थान येथे 164 संत निरंकारी भक्तांतर्फे उत्साहपूर्ण रक्तदान*
September 8, 2026
8:21 pm
*देव दर्शनासाठी गेलेल्या बाप -लेकांचा नर्मदा नदीच्या प्रवाहात बुडून दुर्दैवी अंत….*
August 28, 2026
12:04 pm
