*एरंडोल येथे साई गजानन संस्थान येथे 164 संत निरंकारी भक्तांतर्फे उत्साहपूर्ण रक्तदान*
एरंडोल प्रतिनिधी — युगप्रवर्तक बाबा गुरबचन सिंह जी यांच्या स्मृतीत साजरा होणारा हा वर्षभर चालणाऱ्या सेवा उपक्रमांचा प्रारंभबिंदू आहे. याअंतर्गत देशभरात सुमारे ७०५ ठिकाणी रक्तदान शिबिरे आयोजित केली जाणार असून, करुणा आणि एकात्मतेची भावना अधिक दृढ करण्याचा संकल्प यामागे आहे.
विशेष म्हणजे, रक्तदानाची ही पावन परंपरा मागील चार दशकांपासून अखंडपणे सुरू आहे. आतापर्यंत ९,१७४ रक्तदान शिबिरांच्या माध्यमातून सुमारे १५,००,२३० युनिट रक्त संकलित करण्यात आले असून, मानवसेवेप्रती निरंकारी मिशनची अटळ बांधिलकी यामुळे अधोरेखित होते.
याचाच भाग म्हणून धुळे झोन चे क्षेत्रीय प्रभारी हिरालाल पाटील जी यांच्या मार्गदर्शनाखाली एरंडोल शाखेत दि. 8 सप्टेंबर 2026 मंगळवार रोजी होणाऱ्या रक्तदान शिबिरासाठी 7 सप्टेंबर शनिवार रोजी संपूर्ण एरंडोल शहरात मोटरसायकल,पायदळ रॅली च्या माध्यमातून जन जागृती करण्यात आली आणि मंगळवार रोजी सकाळी 9 ते 5 वाजेपर्यंत ब्रांच एरंडोल येथे श्री. साई गजानन महाराज मंदिर, एरंडोल येथे आयोजित रक्तदान शिबिरात 164 रक्त युनिट संकलन करण्यात आले या ठिकाणी रक्तकेंद्र विभाग इंडियन रेड क्रॉस सोसायटी जळगाव जळगाव येथील अनुभवी डॉक्टर व त्यांच्या सहकाऱ्यांनी रक्तदात्यांची आवश्यक आरोग्य तपासणी करून सुरक्षित, सुव्यवस्थित आणि प्रभावी पद्धतीने रक्तदान प्रक्रिया पूर्ण केली. संपूर्ण आयोजनात स्वच्छता, सतर्कता आणि सेवाभाव यांना विशेष प्राधान्य देण्यात आले. त्यामुळे हा उपक्रम केवळ जीवनदायी सेवापुरता मर्यादित न राहता मानवता, करुणा आणि सामाजिक उत्तरदायित्वाचे उच्च प्रतीक म्हणून समोर आला.युगप्रवर्तक बाबा गुरबचन सिंह जी यांनी सत्य, साधेपणा आणि सद्भावनेचा मार्ग दाखवत तरुणांना नशामुक्त जीवनाचा अवलंब करण्याचे आणि आपली ऊर्जा समाजसेवेसाठी वापरण्याचे आवाहन केले. बाबा हरदेव सिंह जी यांनी “रक्त नाड्यांतून वाहावे, नाल्यांतून नव्हे” हा संदेश देत सेवेला जीवनाचा अविभाज्य घटक बनवले. हाच सेवा-संदेश सतगुरु माता सुदीक्षा जी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली आजही प्रभावीपणे पुढे नेला जात आहे.
रक्तदान शिबीराच्या उदघाटन साठी पाचोरा सेक्टरचे संयोजक परम आ. महेश वाघ जी यांनी फित कापूस केले. तसेच यावेळी एरंडोल नगरपालिका चे नगराध्यक्ष डॉ.नरेंद्र ठाकूर , नगरसेवक मयुर महाजन, प्रा. मनोज पाटील , एरंडोल शहराचे तहसिलदार गोपाल पाटील, सामाजिक कार्यकर्ते यांची अनमोल उपस्थित लाभली तसेच एरंडोल शहरातील अनेक मित्र मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते..
या शिबीरासाठी आलेल्या रक्त दात्यानां अल्पोपहार,भोजन, चहा, बिस्कीट, फळफळावळ व प्रशस्तीपत्र देण्यात आले.
या शिबिराच्या आयोजन नियोजन साठी एरंडोल ब्राँच चे ईंचार्ज विकास पाटील , सेवादल ईंचार्ज गोपाल महाजन, महिला ईंचार्जं बहन कल्पना चौधरी , यांच्या सह एरंडोल सेवादल सदस्य व साध संगत यांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेवुन कार्यक्रम यशस्वी केला.
*एरंडोल येथे साई गजानन संस्थान येथे 164 संत निरंकारी भक्तांतर्फे उत्साहपूर्ण रक्तदान*
संपादक - कैलास महाजन
मनोरंजन
संबंधित बातम्या
*देव दर्शनासाठी गेलेल्या बाप -लेकांचा नर्मदा नदीच्या प्रवाहात बुडून दुर्दैवी अंत….*
August 28, 2026
12:04 pm
