- *भरवस्तीत धाडसी घरफोडी, एरंडोलमध्ये हाॅटेल व्यावसायिक घर बंद करून हॉटेलवर गेला नि कुलूप तोडून चोरट्यांनी ७ लाखांचा मुद्देमाल लांबवला……………!*
एरंडोल प्रतिनिधी -शहरातील अष्टविनायक कॉलनीत बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी साडेतीन लाखांच्या रोकडसह एकूण ७ लाख ८ हजार रुपयांचा ऐवज लांबवल्याची धाडसी घरफोडी उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
जळगांव धुळे रोडवरील ‘ हॉटेल माउली ’ चे संचालक निखिल अनिल चव्हाण (वय ३५ वर्षे ) हे २ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी घराला कुलूप लावून हॉटेलवर गेले होते. मध्यरात्री १२.२५ वाजेच्या सुमारास ते परतले असता त्यांना घराच्या मुख्य दरवाजांचे कुलूप तुटलेले दिसले. बेडरूममधील लाकडी कपाटाचे ड्रॉवर तोडून ३ लाख ५० हजार रुपयांची रोकड, ९७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने,मंगळसूत्र, साखळी, अंगठ्या, कानातील जोड आणि १०० ग्रॅम वजनाच्या चांदीच्या मूर्ती असा एकूण ७ लाख ८ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला होता.निखिल चव्हाण यांच्या फिर्यादीवरून एरंडोल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर पवार हे घटनेचा पुढील तपास करत असून परिसरातील सी सी टी व्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध घेतला जात आहे.
*भरवस्तीत धाडसी घरफोडी, एरंडोलमध्ये हाॅटेल व्यावसायिक घर बंद करून हॉटेलवर गेला नि कुलूप तोडून चोरट्यांनी ७ लाखांचा मुद्देमाल लांबवला……………!*
संपादक - कैलास महाजन
मनोरंजन
संबंधित बातम्या
*देव दर्शनासाठी गेलेल्या बाप -लेकांचा नर्मदा नदीच्या प्रवाहात बुडून दुर्दैवी अंत….*
August 28, 2026
12:04 pm
