- एरंडोल येथे सत्यशोधक समाज संघाची जिल्हा बैठक उत्साहात संपन्न !…
प्रत्येक तालुक्यात सत्यशोधक समाज संघाची कार्यकारणी गठीत करावी : पी डी पाटील [ जिल्हाध्यक्ष सत्यशोधक समाज संघ ]
एरंडोल तालुका अध्यक्षपदी हिलाल फुलारी, उपाध्यक्षपदी दिनेश महाजन तर सचिवपदी अनिल महाजन यांची निवड.
![]()
धरणगाव/एरंडोल प्रतिनिधी –
धरणगाव/एरंडोल : येथील हॉटेल सुंदर च्या सभागृहात सत्यशोधक समाज संघाची जिल्हा बैठक उत्साहात संपन्न झाली. प्रस्ताविक सत्यशोधक समाज संघाचे जिल्हाध्यक्ष पी डी पाटील यांनी केले. अध्यक्षस्थानी एरंडोल नगरीचे मा. नगराध्यक्ष सत्यशोधक दशरथ महाजन होते प्रमुख अतिथी म्हणून सत्यशोधक समाज संघाचे सचिव डॉ सुरेश झाल्टे, विधीकर्ते भगवान रोकडे, निवृत्त तहसीलदार अरुण माळी, संविधान योद्धा धनराज मोतीराय, जिल्हाध्यक्ष रवींद्र तितरे, पत्रकार प्रविण महाजन होते.
तत्पूर्वी मान्यवरांच्या हस्ते महात्मा फुले, सावित्रीमाई फुले, शाहूजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन केले. आलेल्या मान्यवरांचा ग्रंथ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. सहसचिव लक्ष्मणराव पाटील यांनी वामनदादा कर्डक यांचे ” आले महात्मा फुले ” गीत सादर करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. या जिल्हा बैठकीला जामनेर, एरंडोल, धरणगाव, चाळीसगाव, पाचोरा, भडगाव, अमळनेर तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी निवृत्त तहसीलदार अरुण माळी, मोतीराय सर, रविंद्र तितरे आबासाहेब राजेंद्र वाघ, कैलास जाधव, रमेश वराडे यांनी आपापल्या तालुक्याची भूमिका व्यक्त करून मार्गदर्शन केले. विधीकर्ते भगवान रोकडे यांनी प्रत्येक तालुक्यात जास्तीत जास्त सत्यशोधक पद्धतीने विधी करावेत यासाठी प्रयत्न करावे व गावागावात सत्यशोधक समाज संघाचा प्रचार प्रसार करावा. जिल्हाध्यक्ष पी डी पाटील यांनी प्रत्येक तालुक्यात तालुका कार्यकारणी गठीत करावी व सत्यशोधक समाजाचे काम पुढे न्यावे अशा सूचना करत एरंडोल तालुक्याची नवनियुक्त कार्यकारणी गठीत करण्यात आली. सत्यशोधक समाज संघ चे तालुकाध्यक्ष हिलाल फुलारी, उपाध्यक्ष दिनेश महाजन, सचिव अनिल महाजन, सदस्य मनोज महाजन, हेमंत महाजन, स्वप्नील महाजन, हिम्मत महाजन, भूषण महाजन, मिलिंद महाजन यांची एकमताने निवड करण्यात आली. मान्यवरांच्या हस्ते सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना निवडपत्र, पुष्पगुच्छ व ग्रंथ भेट देण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डॉ.सुरेश झाल्टे यांनी सर्व सत्यशोधकांना विस्तृत असे मार्गदर्शन केले येत्या २७ एप्रिल २०२५ रोजी धुळे येथे शेतकरी परिषद होणार आहे व १६ मार्च २०२५ ला राज्यस्तरीय संविधान परिषद एरंडोल नगरीमध्ये संपन्न होणार आहे या दोन्ही ठिकाणी सक्रिय सहभाग नोंदविण्याचे देखील आवाहन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष दशरथ महाजन यांनी मी स्वतः सत्यशोधक असून माझा स्वतःचा विवाह सोहळा १९९९ मध्ये सत्यशोधक पद्धतीनेच झाला आहे. आणि सर्वच विधी देखील सत्यशोधक पद्धतीनेच करतो. यांसह शिवराय फुले शाहू आंबेडकर विचारधारा जोपासत एरंडोल शहरांमध्ये अनेक विवाह लावले यापुढेही जास्तीत जास्त सत्यशोधक विवाह, गृहप्रवेश, गंधमुक्ती, दशक्रिया विधी होतील असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हाध्यक्ष पी डी पाटील तर आभार जिल्हा सहसचिव लक्ष्मणराव पाटील यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी विधीकर्ते शिवदास महाजन कविराज पाटील, प्रल्हाद महाजन, हेमंत माळी, दिनेश महाजन यांनी परिश्रम घेतले.