Home » सामाजिक » *हजारो शेतकऱ्यांना ‘लक्ष्य फाउंडेशन’ची नवसंजीवनी; मोफत स्वयंचलित इलेक्ट्रिक कृषी फवारणी पंपांचे वाटप..*

*हजारो शेतकऱ्यांना ‘लक्ष्य फाउंडेशन’ची नवसंजीवनी; मोफत स्वयंचलित इलेक्ट्रिक कृषी फवारणी पंपांचे वाटप..*

*हजारो शेतकऱ्यांना ‘लक्ष्य फाउंडेशन’ची नवसंजीवनी; मोफत स्वयंचलित इलेक्ट्रिक कृषी फवारणी पंपांचे वाटप..*

प्रतिनिधी : विखरण, तालुका एरंडोल येथे गरजू शेतकऱ्यांसाठी लक्ष्य फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या विशेष उपक्रमात *हजारो शेतकऱ्यांना मोफत स्वयंचलित इलेक्ट्रिक कृषी फवारणी पंपांचे वाटप करण्यात आले.* शेतकऱ्यांच्या शेतीकामाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत त्यांचा वेळ, श्रम आणि खर्च वाचविण्याच्या उद्देशाने राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले.

*कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी खासदार सौ.स्मिताताई वाघ व प्रमुख मान्यवर यांनी छत्रपती शिवाजी महाराज व संतशिरोमणी श्री.सावता माळी महाराज यांच्या पवित्र पावन स्मृतींना पुष्पहार अर्पण करून, विधिवत दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.*

*या विशेष उपक्रमाचे आयोजन लक्ष्य फाउंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष श्री. रोशनजी मराठे.* यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. संस्थेचे कार्याध्यक्ष व प्रवक्ते *श्री.किशोरजी आहिरे.*(चाकण, पुणे)यांनी कार्यक्रमाच्या नियोजनात तसेच सूत्रसंचालनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

 

*खासदार स्मिताताई वाघ यांच्याकडून लक्ष्य फाउंडेशनच्या कार्याचे कौतुक..*

कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थित जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सौ. स्मिताताई वाघ यांनी लक्ष्य फाउंडेशनच्या या सामाजिक उपक्रमाचे शब्दसुमनांनी कौतुक करून गौरव केला.

यावेळी बोलताना त्यांनी *लक्ष्य फाउंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष श्री. रोशनजी मराठे व त्यांचे सर्व सहकारी.* समाजोपयोगी कार्य सातत्याने करीत असल्याचे गौरवोद्गार काढले. खानदेशातील शेतकऱ्यांसाठी तसेच रुग्ण, दिव्यांग आणि समाजातील गरजू घटकांसाठी विविध उपक्रम राबविण्याबरोबरच सीएसआरच्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांना मदत करण्याचे कार्य फाउंडेशन करीत असल्याचे त्यांनी नमूद केले.

*“एरंडोल नगरीचे भूमिपुत्र”असलेले श्री.रोशनजी मराठे यांनी पुण्यासारख्या शहरात उद्योजक म्हणून नावलौकिक मिळविला असून,* आपल्या मातृभूमीशी असलेली नाळ कायम जपत सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून ते करीत असलेले कार्य *अतिशय गौरवास्पद* आहे,” अशा शब्दांत खासदार सौ. स्मिताताई वाघ यांनी लक्ष्य फाउंडेशनच्या कार्याचे कौतुक केले.

*डॉ. युवराज येडुरे यांच्या विशेष सहकार्यातून CSR निधी*

या उपक्रमासाठी डॉ. युवराज येडुरे सर, अध्यक्ष – महा एनजीओ डेव्हलपमेंट असोसिएशन यांच्या विशेष सहकार्यातून सीएसआर निधी उपलब्ध करून देण्यात आला. या निधीच्या माध्यमातून गरजू शेतकऱ्यांना आधुनिक कृषी साधन उपलब्ध करून देण्यात आल्याने शेतकऱ्यांच्या शेतीकामाला मोठी मदत होणार आहे.

सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्याचा हा उपक्रम निश्चितच प्रेरणादायी असल्याचे उपस्थित मान्यवरांनी सांगितले.

*मान्यवरांकडून उपक्रमाचे भरभरून कौतुक..*

कार्यक्रमास नायब तहसीलदार श्री.अमोल बन साहेब, डॉ. राधेश्याम चौधरी – जिल्हाध्यक्ष, भाजपा, मा. नानाभाऊ महाजन – मा. जि. प. सदस्य, गोपाल महाजन – सरपंच, विखरण, उद्योजक आनंदराव चौथे, डॉ. धनंजय बेंद्रे सर, ह.भ.प. संजय जमादार सर, उद्योजक समाधानभाऊ पाटील, उद्योजक बाळासाहेब मोझे, उद्योजक विष्णुआप्पा बाळदे, सुभाष गुंजाळ साहेब, दीपक राजपूत – सरपंच, खडके, खंडूभाऊ गवळी – माजी सरपंच, दीपक राजपूत – तालुका उपाध्यक्ष, भाजपा, उद्योजक गणेश बडगुजर, दीपक म्हासाळ – माजी सरपंच, पिंपळकोठा, सोमनाथ चौधरी – माजी सरपंच, बहादरपूर, आरोग्यदूत पितांबर भावसार, मनोज दादा पेले, उमेशभाऊ पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

तसेच शिरसोदे, ता. पारोळा येथील आदर्श सरपंच श्री. रमेश काशिनाथ सौंदाणे आणि बहादरपूर येथील समाजसेवक श्री. राकेशजी गुरव यांचीही विशेष उपस्थिती होती.

*यावेळी मा. नानाभाऊ महाजन यांनी लक्ष्य फाउंडेशनचे श्री. रोशनजी मराठे.* यांच्या कार्याचे कौतुक करताना सांगितले की, युवक, दिव्यांग, रुग्ण आणि आता शेतकरी अशा समाजातील विविध घटकांसाठी ते सातत्याने कार्य करीत आहेत. विशेष म्हणजे ते जळगाव जिल्ह्यातील एरंडोल नगरीचे भूमिपुत्र असून, आपल्या मातृभूमीचे ऋण फेडण्याच्या भावनेतून समाजोपयोगी कार्य करीत असल्याचे त्यांनी गौरवोद्गाराने नमूद केले.

डॉ. राधेश्याम चौधरी यांनीही मोफत इलेक्ट्रिक कृषी फवारणी पंप वाटपाच्या या उपक्रमाचे भरभरून कौतुक केले.

*दोन महिन्यांच्या अथक परिश्रमातून भव्य कार्यक्रमाचे नियोजन..*

*या संपूर्ण उपक्रमाचे मुख्य नियोजन उद्योजक श्री. राकेशजी मराठे तसेच लक्ष्य फाउंडेशनच्या सर्व कार्यसेवकांनी केले. गेल्या सुमारे दोन महिन्यांपासून शेतकऱ्यांपर्यंत हा लाभ पारदर्शक आणि योग्य पद्धतीने पोहोचविण्यासाठी कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.*

विखरण, एरंडोल तालुका तसेच पंचक्रोशीतील गरजू शेतकऱ्यांची योग्य निकषांच्या आधारे निवड करण्यात आली. पात्र लाभार्थ्यांना कोणताही आर्थिक भार न देता मोफत स्वयंचलित इलेक्ट्रिक कृषी फवारणी पंप उपलब्ध करून देण्यात आले.

कार्यक्रमाच्या उत्कृष्ट नियोजनामुळे वितरण प्रक्रिया शिस्तबद्ध आणि सुरळीत पार पडली. आधुनिक कृषी साधने मिळाल्यामुळे शेतकऱ्यांच्या कामाचा वेग वाढण्यासोबतच वेळ, श्रम आणि खर्चाची बचत होण्यास मदत होणार आहे.

*‘शेतकरी हित हाच केंद्रबिंदू’*

*लक्ष्य फाउंडेशनच्या माध्यमातून समाजातील गरजू घटकांना प्रत्यक्ष मदत मिळवून देण्याचा प्रयत्न सातत्याने सुरू आहे.* शेतकरी हा केंद्रबिंदू मानून आधुनिक कृषी साधने उपलब्ध करून देण्याचा हा उपक्रम सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण ठरला आहे.

“शेतकऱ्यांच्या हाताला आधुनिक साधनांची ताकद देऊन त्यांच्या श्रमाला सन्मान मिळवून देणे, हाच लक्ष फाउंडेशनचा संकल्प आहे,” असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

हजारो शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य फुलविणाऱ्या या उपक्रमाबद्दल लक्ष फाउंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष, पदाधिकारी, कार्यसेवक, सीएसआर सहकारी तसेच सर्व आयोजकांचे शेतकरी बांधवांकडून विशेष कौतुक करण्यात आले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कार्यकर्त्यांचे अथक परिश्रम

या भव्य उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्री. राकेश मराठे, हर्षल पाटील, सम्राट राजपूत, धीरज पाटील, कार्तिक ठाकूर, लोकेश पाटील, निखिल चौधरी, गोरख पाटील, मनोज सोनवणे, सुनील पाटील, सौरभ पाटील, करण पाटील, सुमित मराठे, संदीप पाटील, विनय महाजन, गणेश महाजन आणि बाला राजपूत यांनी विशेष मेहनत घेतली.

त्यांच्या नियोजनबद्ध प्रयत्नांमुळे कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला. कार्यक्रमाला हजारो शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त उपस्थिती लावत लक्ष फाउंडेशनच्या या सामाजिक उपक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

HUF Registration Services In India
मनोरंजन
संबंधित बातम्या

एरंडोलच्या प्रशासकीय सुविधांच्या बळकटीकरणाकडे आणखी एक महत्त्वाचे पाऊल! एरंडोल दुय्यम निबंधक श्रेणी-१ कार्यालयाच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे २ कोटी ८६ लाखांच्या खर्चातून लोकार्पण; आमदार ॲड. अमोलदादा पाटील यांच्या शुभहस्ते उद्घाटन…