Home » सामाजिक » *एरंडोल येथे वारकरी सांप्रदायातील प्रथम शैवपंथी संत शिरोमणी नरहरी सोनार यांची ७३९ वी पुण्यतिथी उत्साहात संपन्न….!*

*एरंडोल येथे वारकरी सांप्रदायातील प्रथम शैवपंथी संत शिरोमणी नरहरी सोनार यांची ७३९ वी पुण्यतिथी उत्साहात संपन्न….!*

  1. *एरंडोल येथे वारकरी सांप्रदायातील प्रथम शैवपंथी संत शिरोमणी नरहरी सोनार यांची ७३९ वी पुण्यतिथी उत्साहात संपन्न….!*

    एरंडोल – सालाबादप्रमाणे या वर्षीही येथील अहिर सुवर्णकार समाज तर्फे वारकरी सांप्रदायातील शैवपंथी व सुवर्णकार समाजाचे आराध्य दैवत संत नरहरी सोनार यांची पुण्यतिथी उत्साहात साजरी करण्यात आली. सर्वप्रथम पिंगळे ज्वेलर्स यांच्या दुकानासमोर पालखीचे पूजन समाजाचे अध्यक्ष सचिन विसपुते यांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी समाजातील सर्व ज्येष्ठ व श्रेष्ठ मान्यवर महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    पालखी मिरवणूक मुख्य रस्त्यापासून खोल महादेव मंदिर, अमळनेर दरवाजा, साई गजानन मंदिर पासून स्वामी समर्थ केंद्र पर्यंत नेण्यात आली. पालखी मिरवणूकीत टाळ मृदुंगाच्या गजरात भजन किर्तन म्हटले जात होते. समाजाच्या सर्व महिलांनी टाळ हाती घेऊन, फुगड्या खेळून मिरवणुकीत शोभा आणली.
    पालखी मिरवणूकीनंतर संत नरहरी सोनार यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.अध्यक्षस्थानी समाजाचे अध्यक्ष सचिन विसपुते हे होते. प्रमुख अतिथी म्हणून प्रा .मनोज पाटील, जगदीश ठाकूर ,कविवर्य विलास मोरे,अहिर सुवर्णकार समाजाच्या महिला अध्यक्ष रत्नाताई देवरे,ॲड .शितल विसपुते,ईश्वर सोनार आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
    यावेळी सचिन विसपुते यांनी सोनार समाजाची महती, समाजाने आज पर्यंत केलेले समाज उपयोगी कार्य याची माहिती दिली.प्रा.मनोज पाटील यांनी समाजाचे पुढील कार्यक्रम करण्यासाठी त्यांना स्वतःची जागा नगरपालिकेच्या माध्यमातून मिळवून देऊ अशी ग्वाही दिली.जगदीश ठाकूर यांनी संत नरहरी महाराजांचे जीवन कार्य विशद केले. कविवर्य विलास मोरे यांनी सोनार समाज हा जाणता वर्ग असून कान टोचण्यापासून तर देव घडवण्यापर्यंतचे कार्य या समाजाकडून केले जाते.असे सांगितले.ॲड.शितल विसपुते यांनी आज सर्व समाजामध्ये लग्नाची परिस्थिती किती बिकट होत चालली असून याला मुलं-मुली यांच्यासोबतच आई-वडील पण कशा पद्धतीने जबाबदार आहेत हे स्पष्ट केले.
    कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जगदीश सोनार,लोकेश बाविस्कर,योगेश वाघ, नितीन पिंगळे,जगदीश मोरे,हर्षल रणधीर,गणेश दाभाडे, शाम सोनार,नारायण मोरे, विजय भामरे, अशोक शेठ मोरे,सुधीर मोरे यांनी मोलाचे सहकार्य केले.सामाजिक बांधिलकी म्हणून ईश्वर सोनार यांच्याकडून महाप्रसादाचा लाभ देण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शशिकांत बिरारी यांनी केले.तर आभार प्रदर्शन ईश्वर सोनार यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

HUF Registration Services In India
मनोरंजन
संबंधित बातम्या