- *एरंडोल नगर वाचनालय येथे शिवजयंती उत्साहात साजरी.*.
- एरंडोल प्रतिनिधी – शहरातील नगर वाचनालय येथे दिनांक 19 फेब्रुवारी रोजी शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला नगर वाचनालयाचे अध्यक्ष माजी नगरसेवक श्री जगदीश भाऊ ठाकूर यांच्या हस्ते माल्या अर्पण करण्यात आले. यावेळी नगर वाचनालयाचे चिटणीस श्री रवींद्र लांळगे, सहचिटणीस श्री संतोष वंजारी, संचालक डॉ प्रेमराज पळशीकर, श्री परेश बिर्ला, श्री जाधवराव जगताप, श्री गुरुदास पाटील हे उपस्थित होते. कार्यक्रमानंतर संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून आदरांजली वाहिली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे ग्रंथपाल श्री देवेंद्र वंजारी, लिपिक संजय अग्निहोत्री, गोकुळ मोरे यांनी परिश्रम घेतले.
एरंडोल नगर वाचनालय येथे शिवजयंती उत्साहात साजरी.*.
संपादक - कैलास महाजन
मनोरंजन
संबंधित बातम्या
*देव दर्शनासाठी गेलेल्या बाप -लेकांचा नर्मदा नदीच्या प्रवाहात बुडून दुर्दैवी अंत….*
August 28, 2026
12:04 pm

