-
*एरंडोल येथे वंध्यत्व निवारण शिबिरात ३१ जोडप्यांची विनामूल्य तपासणी……!*
एरंडोल प्रतिनिधी – येथे महिला दिनानिमित्त १६ मार्च २०२५ रोजी एरंडोल तालुका मेडिकल असोसिएशन तर्फे वंध्यत्व निवारण शिबिराचे आयोजन करण्यात आले.यावेळी येवला ( नाशिक ) येथील नामांकित तज्ञ डॉ.कविता दराडे यांनी ३१ जोडप्यांची सोनोग्राफी,सिमेन ॲनालिसीस इ.नि:शुल्क तपासणी करून योग्य मार्गदर्शन केले.
मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.सुधीर काबरा व माजी उपनगराध्यक्ष डॉ.सुरेश पाटील यांच्या हस्ते फीत कापून शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.यावेळी असोसिएशनचे सचिव डॉ.राहूल वाघ, डॉ.किरण पाटील, डॉ.आर.टी.पाटील, डॉ
पळशीकर, डॉ.गितांजली ठाकूर, डॉ.मोहिनी वाघ, डॉ.राखी काबरा आदी डॉक्टर्स,पी आर ओ शेखर बुंदेले उपस्थित होते.शिबिरानंतर डॉ.कविता दराडे यांनी उपस्थित डॉक्टरांना मार्गदर्शन केले.असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.सुधीर काबरा यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले.डाॅ.राहूल वाघ यांनी आभार प्रदर्शन केले.