-
*ध्यास असल्याशिवाय यश गाठता येत नाही* : *कवी प्रा.वा. ना.आंधळे*
-
चोपडा प्रतिनिधी : अध्ययन आणि अध्यापन या दोन्ही गोष्टींसाठी साधना आवश्यक असते.आणि साधना ध्यासाशिवाय फलद्रुप होत नाही.परिणामी ध्यास हाच यशापर्यंत जाण्याचा मार्ग ठरतो.सारे प्रतिपादन खान्देशातील सुप्रसिद्ध कवी प्रा.वा. ना.आंधळे यांनी दि.१३एप्रिल २०२५ रोजी चोपडा येथे संपन्न झालेल्या आयडियल इंग्लिश अकॅडमीनेआयोजित केलेल्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभावेळी उपस्थित विद्यार्थी पालक वृंदासमोर केले.
यावेळी व्यासपीठावर पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र पाटील,जयहिंद महाविद्यालयातील डॉ.प्रा.समाधान पाटील,अकॅडमीचे प्राचार्य पद्माकर पाटील यांची उपस्थिती होती.
प्रा.आंधळे पुढे म्हणाले की,भाषा ही संकेत असून ती सामाजिक अभिसरणाचं प्रभावी माध्यम आहे.तेव्हा भाषेच्या सौंदर्याकडे व सामर्थ्यांकडे जाणिवेने पाहण्याची व भाषा अभ्यासण्याची गरज असल्याचे सांगत त्यांनी भरभरून संस्कार देणाऱ्या जुन्या नव्या कवितांचे संदर्भमूल्य विद्यार्थ्यांपुढे ठेवलेत.
यावेळी पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र पाटील,प्रा.डॉ.समाधान पाटील यांनीही मार्गदर्शनपर मनोगते संपन्न झालीत.
आयडियल इंग्लिश अकॅडमीचा उद्देश शालेय शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कसा होईल.यावर भर देणारी संस्था असून विद्यार्थी हा भाषिक दृष्ट्या संपन्न व्हावा यासाठी कटिबद्ध असल्याचे आयडियल अकादमीचे प्राचार्य पद्माकर पाटील यांनी प्रस्ताविकातून सांगितले.
विद्यार्थ्यांच्या विविध स्पर्धा परीक्षा,इंग्लिश ऑलिंपियाड,भाषिक उपक्रम,व्याकरण परीक्षा,स्पेलिंग बी,ड्रॉईंग एक्झामीनेशन,आयडियल स्टुडंट ऑफ द इयर,आयडियल सुपर स्पेलर्स,आयडियल सुपर रिडर्स, आयडियल बेस्ट बुक किपर्स या संदर्भात विद्यार्थ्यांना मेडल देऊन गौरविण्यात आले.
याच समारंभात अकॅडमी चे प्राचार्य पद्माकर पाटील यांना नुकतेच लोकमत शिलेदार या पुरस्काराने सन्मानित केल्याप्रित्यर्थ समारंभाचे प्रमुख अतिथी तथा व्याख्याते प्रा.वा. ना.आंधळे यांचे शुंहस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
तीन तास चाललेल्या या कार्यक्रमाचे प्रवाही सूत्रसंचालन कु.जानवी पाटील,यशश्री चव्हाण,श्रेया मोरे,प्रगती पाटील,थोरवी सोनवणे,दीप पाटील,देवांशू सोनवणे,मिहीर पाटील,दुर्वा बाविस्कर,विधी चौधरी,प्रज्ञा चौधरी यांनी टप्प्याटप्प्याने केले.यशश्री चव्हाण हिने आभार मानले.