Home » शैक्षणिक » *शास्त्री फार्मसी डी. फ़ार्मसीच्या विद्यार्थ्यांचा निकाल १००%*

*शास्त्री फार्मसी डी. फ़ार्मसीच्या विद्यार्थ्यांचा निकाल १००%*

  1. *शास्त्री फार्मसी डी. फ़ार्मसीच्या विद्यार्थ्यांचा निकाल १००%*
  2. एरंडोल प्रतिनिधी–पळासदळ येथील शास्त्री इन्स्टिटयूट ऑफ फार्मसीच्या डिप्लोमा फार्मसी चा उन्हाळी परीक्षा २०२५ चा निकाल महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ द्वारे नुकताच जाहीर करण्यात आला, त्यात विद्यार्थ्यांना घवघवीत यश प्राप्त झाले. प्रथम व द्वितीय वर्ष डी. फार्म परीक्षेचा १००% निकाल लागला. प्रथम वर्ष डी. फार्म च्या पाटील भाग्यश्री संजय हिने ६८.८० % मिळवून प्रथम क्रमांक पटकावला, पवार भाऊसाहेब किसन याने ६८.१० % मिळवून द्वितीय क्रमांक मिळवला तर धनगर रुचिता विजय व पाटील महेंद्र आत्माराम या दोघांनी ६८% मिळवून त्रितिय स्थान प्राप्त केले. द्वितीय वर्ष डी. फार्म मध्ये ममता लक्ष्मण पाटील हिने ८२.१८ % मिळवून प्रथम क्रमांक पुन्हा पटकावला, मागील वर्षी देखील या विद्यार्थिनीने प्रथम वर्ष डी. फार्म मध्ये प्रथम क्रमांक पटकावला होता. लोहार प्रिया मच्चीन्द्र हिने ७७.६४ % मिळवून द्वितीय क्रमांक मिळवला तर पाटील वैष्णवी देविदास हिने ७५.६४ % मिळवून त्रितिय स्थान प्राप्त केले. विद्यार्थ्यांना मिळालेल्या या यशा बद्दल संस्थेचे सचिव सौ. रूपा शास्त्री, प्राचार्य डॉ. विजय शास्त्री, उपप्राचार्य डॉ. पराग कुलकर्णी, सर्व शिक्षक व शिकेत्तर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे व पालकांचे अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

HUF Registration Services In India
मनोरंजन
संबंधित बातम्या

आमदार अमोलदादा पाटील यांच्या प्रयत्नांना यश साठवण तलाव पद्मालय -2 उपसा सिंचन योजना ता.एरंडोल प्रकल्पाचा रुपये 1072.45 कोटी किंमतीच्या द्वितीय सुधारित प्रशासकीय मान्यता प्रस्तावास मंजुरी