- *गालापूर येथे ख्यातनाम सिने अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या हस्ते विविध विकासकामांचे उद्घाटन उत्साहात……!*
एरंडोल प्रतिनिधी – तालुक्यातील पद्मालयाच्या डोंगराच्या पायथ्याशी वसलेले गालापूर येथे सिने अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी गुरुवारी २२ जानेवारी रोजी भेट देऊन ग्रामस्थ व शाळकरी मुले,मुली यांच्याशी संवाद साधला.तसेच विविध विकासकामांचे त्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.याशिवाय ‘ जलतारा ‘ चे भुमिपूजन, होऊन परसबाग,वृक्ष लागवड या कामांची पाहणी करण्यात आली.शाळा व अंगणवाडीचे डिजिटलायझेशन पाहून त्यांनी प्रशंसा करून गौरवोद्गार काढले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार स्मिताताई वाघ होत्या.आमदार अमोल पाटील यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होती.यावेळी ग्रामपंचायत कार्यालयातील काॅमन सर्व्हिस सेंटर,जि.प.शाळेतील संगणक लॅब, ग्रामपंचायत कार्यालयातील ३ के व्ही सोलर प्रकल्प या उपक्रमांचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.यावेळी शालेय परसबाग, शाळा व अंगणवाडीतील डिजिटलायझेशन व इतर उपक्रमांची पाहणी करण्यात आली.
गालापूर या गावाच्या विकासासाठी आपण सर्वतोपरी मदत करून विकासाचा आलेख उंचावण्यासाठी कटीबद्ध असल्याची ग्वाही आमदार अमोल पाटील यांनी याप्रसंगी दिली.
प्रास्ताविक ग्रामपंचायतीचे सरपंच महेंद्र महाजन यांनी केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ग्रामसेवक आर.एम.पवार यांनी केले.आभारप्रदर्शन नंदलाल पाटील यांनी केले.
याप्रसंगी जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल,जि.प.चे माजी उपाध्यक्ष ज्ञानेश्वर आमले, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील, गटविकास अधिकारी दादाजी जाधव, बबलू पाटील,कमलेश पाटील, सरपंच गौरव पाटील,आरिफ शेख, नितेश खैरनार, रोहीदास सोनवणे, किशोर महाजन व ग्रामस्थ उपस्थित होते.
