- *एरंडोल येथे लोकनियुक्त नगराध्यक्षासह नगरसेवक व नगरसेविकांचा गुजर समाजातर्फे सत्कार…….!*
एरंडोल प्रतिनिधी – येथे गुजर समाजातर्फे मारोती मढी नजीक नवनिर्वाचित लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ. नरेंद्र ठाकूर उपाध्यक्षा सुनिता माळी यांचेसह सर्व नगरसेवकांचा सत्काराचा कार्यक्रम १३ फेब्रुवारी २०२६ रोजी पार पडला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार अमोल पाटील हे होते.प्रारंभी दिपप्रज्वलन होऊन सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करण्यात आला.याप्रसंगी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्यात आला.त्यात सेवानिवृत्त आरोग्य सेविका शोभा पाटील, यजुर्वेंद्र महाजन, दिनेश पाटील ( छोटू पहेलवान), नगरसेविका कमलताई पाटील,भारती गुर्जर, डॉ.नरेंद्र पाटील, श्रीराम गणेश मंडळ पदाधिकारी यांचा समावेश होता.व्यासपीठावर मृणालताई पाटील, शिवसेनेचे गटनेते प्रा.मनोज पाटील, आनंद दाभाडे यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होती
प्रास्ताविक प्रा.जी.आर.महाजन यांनी केले, सुत्रसंचालन नरेंद्र पाटील यांनी केले.आभारप्रदर्शन संध्या पाटील यांनी केले.
यावेळी नगरसेवक अनिल महाजन, रविंद्र महाजन, मयुर महाजन, कृष्णा ओतारी,अमोल तंबोली, नरेंद्र पाटील आदी नगरसेवक तसेच नगरसेविका कमलताई पाटील,भारती गुर्जर,छाया दाभाडे, पौर्णिमा देवरे,आरती महाजन आदी नगरसेविका उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गुर्जर समाज अध्यक्ष गोपाल पाटील, ॲड.नितीन महाजन,गोरख महाजन,माधव पाटील, रामदास पाटील दिनेश महाजन,शरद पाटील, अरूण पाटील, तसेच गुर्जर युवकांनी व गुर्जर सखी मंडळाच्या पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.
