Home » सामाजिक » *घरकाम करणाऱ्या महिलांचा सन्मान, महिला दिनानिमित्त आगळावेगळा उपक्रम………!* ​

*घरकाम करणाऱ्या महिलांचा सन्मान, महिला दिनानिमित्त आगळावेगळा उपक्रम………!* ​

  1. *घरकाम करणाऱ्या महिलांचा सन्मान, महिला दिनानिमित्त आगळावेगळा उपक्रम………!*


    एरंडोल – जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून कौन्सिलर शिवाली पाटील-देशमुख यांच्या वतीने आपल्या घरासाठी अहोरात्र कष्ट करणाऱ्या घरकामगार महिलांच्या सन्मानाचा एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात महिलांच्या आरोग्याविषयी मार्गदर्शन करून त्यांना साडी वाटप व अल्पोपहार देण्यात आला.​कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेच्या पूजनाने करण्यात आली.कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ. नरेंद्र ठाकूर व नामवंत डॉ. अमरीन बोहरी उपस्थित होते.
    कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना कौन्सिलर शिवाली पाटील-देशमुख यांनी या उपक्रमामागची भावना स्पष्ट केली. त्या म्हणाल्या की, “ज्या महिला आपल्या घराची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेऊन आपल्याला मदत करतात, त्यांचा सन्मान करणे हे आपले कर्तव्य आहे. घरासाठी राबणाऱ्या हातांचा सन्मान होणे हीच खरी महिला दिनाची पावती आहे .” यावेळी त्यांनी महिलांना मानसिक आरोग्याची काळजी कशी घ्यावी. यावर सखोल समुपदेशन केले.
    ​ ​नगराध्यक्ष ​डॉ. नरेंद्र ठाकूर यांनी महिलांनी धावपळीच्या जीवनात स्वतःच्या शरीराकडे दुर्लक्ष करू नये.असे आवाहन केले. कुटुंबाची काळजी घेताना स्वतःचे पोषण आणि विश्रांती तितकीच महत्त्वाची असल्याचे त्यांनी नमूद केले.
    ​डॉ. अमरीन बोहरी यांनी शारीरिक आणि मानसिक आरोग्याचा समतोल कसा साधावा. यावर अनमोल मार्गदर्शन केले.तणावमुक्त राहण्यासाठी आणि छोट्या-मोठ्या आजारांकडे दुर्लक्ष न करता वेळेवर उपचार घेण्याबाबत त्यांनी महिलांना प्रोत्साहित केले.
    ​या कार्यक्रमात उपस्थित सर्व महिलांना सन्मानपूर्वक साडी वाटप करण्यात आले. आपला अशा प्रकारे सन्मान होत असल्याचे पाहून अनेक महिला भावूक झाल्या होत्या. कार्यक्रमानंतर सर्वांसाठी अल्पोपहाराचे आयोजन करण्यात आले होते.
    ​​कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन ॲड. मधुकर देशमुख यांनी केले. या स्तुत्य सामाजिक उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

HUF Registration Services In India
मनोरंजन
संबंधित बातम्या

*एरंडोल हे चाळीसगाव येथील नियोजित अपर जिल्हाधिकारी कार्यालयाला जोडण्यास तीव्र विरोध, ‘ जळगावच सोयीचे ‘ अशी जनतेची आग्रही मागणी……..!* ​ *प्रशासकीय निर्णयामुळे अंतराचा फेरा वाढणार,सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन………!*