Home » शैक्षणिक » *शासकीय आयटीआय,जळगांव येथे प्रवेशाची सुवर्णसंधी, १७७ जागांसाठी समुपदेशन फेरी जाहीर…………!*

*शासकीय आयटीआय,जळगांव येथे प्रवेशाची सुवर्णसंधी, १७७ जागांसाठी समुपदेशन फेरी जाहीर…………!*

  1. *शासकीय आयटीआय,जळगांव येथे प्रवेशाची सुवर्णसंधी, १७७ जागांसाठी समुपदेशन फेरी जाहीर…………!*

    एरंडोल  प्रतिनिधी =
    कवयित्री बहिणाबाई चौधरी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय), जळगाव येथे ऑगस्ट २०२६ प्रवेशसत्रांतर्गत रिक्त राहिलेल्या विविध १५ हून अधिक व्यवसायांच्या ( ट्रेड्स ) एकूण १७७ जागांसाठी समुपदेशन फेरी ( कौन्सिलींग राऊंड ) आयोजित करण्यात आली आहे. प्रवेशापासून वंचित राहिलेल्या गुणवंत उमेदवारांसाठी ही एक उत्तम सुवर्णसंधी आहे.
    ​समुपदेशन फेरीचे वेळापत्रक खालील प्रमाणे.
    १) ​ऑनलाइन/प्रत्यक्ष हजेरी नोंदवणे: ज्या उमेदवारांनी २०२६ च्या प्रवेशसत्रासाठी अर्ज केला आहे पण अद्याप प्रवेश मिळालेला नाही, त्यांनी ९ ऑगस्ट ते १० ऑगस्ट २०२६ दरम्यान आपल्या ऑनलाइन लॉगिनद्वारे किंवा प्रत्यक्ष संस्थेत उपस्थित राहून हजेरी नोंदवणे अनिवार्य आहे.
    २) ​गुणवत्ता यादी जाहीर होणे: ११ ऑगस्ट २०२६ रोजी ऑनलाईन गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाईल.
    ३) ​प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रिया: १२ ऑगस्ट ते १३ ऑगस्ट २०२६ दरम्यान गुणवत्तेनुसार प्रत्यक्ष मेरीट यादीद्वारे प्रवेश निश्चित केले जातील.
    ​उपलब्ध जागांचा प्रमुख तपशील पुढीलप्रमाणे.
    टूल अँड डाय मेकर ( जे ॲण्ड एफ) – ३८, पीपीओ – २६, टूल अँड डाय मेकर ( डि ॲण्ड एम ) – १८, टर्नर डि एस टी – १८, मशिनिस्ट डि एस टी– १५, मशिनिस्ट ग्राइंडर – ११, डीएएमटी – ८, पंप ऑपरेटर कम मॅकेनिक – ८, मोटर मेकॅनिक ( एम एम व्ही ) – ६, डिझेल मेकॅनिक – ५, वेल्डर – ४, कोपा ( काॅम्प्युटर ऑपरेटर ॲण्ड प्रोग्रामिंग असिस्टंट) – ४, ट्रॅक्टर मेकॅनिक – ३, फाऊंड्रीमन – ३, मशिनिस्ट – ३, आरएसी ( रिफ्रीजरेशन ॲण्ड एअर कंडिशनिंग) – २, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक – १, टर्नर – १, ड्राफ्ट्समन – १, इलेक्ट्रिशियन – १ आणि इतर १ अशा एकूण १७७ जागा उपलब्ध आहेत.
    ​ निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी प्रवेशाच्या वेळी मूळ अर्जासोबत जोडलेली सर्व मूळ प्रमाणपत्रे आणि आवश्यक फी सोबत आणणे बंधनकारक आहे. अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी संस्थेशी संपर्क साधावा, असे आवाहन प्राचार्य वाय. के. कुलकर्णी यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

HUF Registration Services In India
मनोरंजन
संबंधित बातम्या

एरंडोलच्या प्रशासकीय सुविधांच्या बळकटीकरणाकडे आणखी एक महत्त्वाचे पाऊल! एरंडोल दुय्यम निबंधक श्रेणी-१ कार्यालयाच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे २ कोटी ८६ लाखांच्या खर्चातून लोकार्पण; आमदार ॲड. अमोलदादा पाटील यांच्या शुभहस्ते उद्घाटन…

*जिल्ह्याचे पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील,माजी आमदार चिमणराव पाटील व विद्यमान आमदार ॲड अमोल पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे एरंडोल येथे आदिवासी विकास उपविभागीय कार्यालयास मान्यता ………….!* *एरंडोल,पारोळा मतदारसंघातील अनुसूचित जमातीच्या नागरिकांना होणार स्थानिक पातळीवर शासकीय सेवायोजनांचा लाभ………..!*

*एरंडोलच्या तहसीलदारांवर अवैध मुरूम कारवाईदरम्यान हल्ला, ३ जणांवर गुन्हा दाखल…………..!*​अवैध मुरूम वाहतूक रोखणाऱ्या महसूल पथकाला शिवीगाळ व धमकी; राहुल महाजनसह तिघांवर महसूल कायद्यांतर्गत गुन्हा………….!*