Home » सामाजिक » *एरंडोल मध्ये जय श्रीराम प्रतिष्ठानतर्फे भव्य रक्तदान शिबिर,२८ रक्तदात्यांनी केले उत्स्फूर्त रक्तदान………..!

*एरंडोल मध्ये जय श्रीराम प्रतिष्ठानतर्फे भव्य रक्तदान शिबिर,२८ रक्तदात्यांनी केले उत्स्फूर्त रक्तदान………..!

  1. *एरंडोल मध्ये जय श्रीराम प्रतिष्ठानतर्फे भव्य रक्तदान शिबिर,२८ रक्तदात्यांनी केले उत्स्फूर्त रक्तदान………..!

    एरंडोल प्रतिनिधी – शहरातील जय श्रीराम प्रतिष्ठानतर्फे सालाबादप्रमाणे यावर्षीही २१ मार्च २०२६ रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला शहरातील नागरिकांनी मोठ्या उत्साहाने प्रतिसाद देत स्वयंस्फूर्तीने रक्तदान केले. सामाजिक बांधिलकी जपत गरजू रुग्णांना मदत व्हावी या उद्देशाने आयोजित करण्यात आलेले हे शिबिर यशस्वी ठरले.रक्तदान हे श्रेष्ठ दान मानले जाते या भावनेतून युवकांसह महिलांनीही या शिबिरात सक्रिय सहभाग नोंदवला. सदर रक्तदान शिबिरात २८ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
    शिबिरात जळगाव येथील ‘ रेड प्लस ’ संस्थेच्या वैद्यकीय पथकाने रक्तसंकलनाची जबाबदारी पार पाडली. यामध्ये डॉ. रवी पाटील यांच्यासह टेक्निशियन अमोल सोये, राजेश बारेला, ऋतुजा लाड आणि मोहिनी झुमडे यांनी मोलाचे सहकार्य केले. त्यांच्या कुशल मार्गदर्शनामुळे संपूर्ण प्रक्रिया सुरळीत पार पडली.
    जय श्रीराम प्रतिष्ठान गेल्या अनेक वर्षांपासून “अध्यात्माबरोबर आरोग्य ” ही संकल्पना राबवत आहे. गुढीपाडव्यापासून रामनवमीपर्यंत आयोजित करण्यात येणाऱ्या श्री सर्वेश्वर शिव महापुराण कथेदरम्यान विविध आरोग्यविषयक उपक्रम राबविले जातात.अशा उपक्रमांमुळे समाजात वाढण्यासोबतच सामाजिक एकोपाही दृढ होत असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.भविष्यातही असेच सामाजिक उपक्रम राबविण्याचा निर्धार प्रतिष्ठानतर्फे व्यक्त करण्यात आला.
    शिबिराच्या यशस्वितेसाठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा .नितीन पाटील उपाध्यक्ष अमर महाजन सचिव प्रदीप फराटे यांनी तसेच श्रीराम प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

HUF Registration Services In India
मनोरंजन
संबंधित बातम्या

*राष्ट्रीय महामार्गावर पुन्हा रक्ताचा सडा, अमळनेर नाक्यावर भीषण अपघात, कंटेनरच्या जोरदार धडकेत एरंडोलचे प्रतिष्ठित शेतकरी ठार……..!* ​ *बोगद्याच्या अभावी आणखी एका निष्पापाचा बळी, परिसरात संतापाची लाट……..!*

*एरंडोल पारोळा विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार आबासाहेब चिमणराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त एरंडोल शहरात विविध सामाजिक उपक्रमांचा जागर……..!* ​ *पाणीपोईचा शुभारंभ, रुग्णांना फळवाटप आणि गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप………….!*