-
*एरंडोल येथे कमलनाम साहित्य मंचची स्थापना उत्साहात……..!*

एरंडोल प्रतिनिधी – येथे २१ मार्च २०२६ जागतिक कविता दिनाचे औचित्य साधून कमलनाम साहित्य मंचची स्थापना करण्यात आली.याप्रसंगी सुर्योदय ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष अरुण माळी यांच्या हस्ते फित कापून साहित्य मंच व कवी संमेलन बॅनरचे उद्घाटन करण्यात आले.तसेच नवीन कार्यकारिणी संचालक मंडळ फलकाचे अनावरण नगर वाचनालयाचे अध्यक्ष जगदीश ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले.
कमलनाम साहित्य मंच कार्यकारी मंडळ पुढील प्रमाणे.
१) प्रा.वा.ना.आंधळे अध्यक्ष २) निंबा बडगुजर उपाध्यक्ष,३)मनोहर आंधळे कार्याध्यक्ष,४)पी.जी.चौधरी कोषाध्यक्ष,५)विनायक कुलकर्णी सचिव.
संचालकांमध्ये सेवानिवृत्त तहसीलदार अरूण माळी,प्रवीण महाजन, सरिता रघुवंशी,क्षमा साळी, दिनेश घुगे,प्रघ्नेश झांबरे यांचा समावेश आहे.
यावेळी जगदीश साळी, रघुनाथ कोठावदे,शालीनी कोठावदे,सरिता रघुवंशी आदी उपस्थित होते.
