-
*सत्यशोधक समाज संघाचे रवींद्र महाजन यांना राज्यस्तरीय ‘ क्रांतीसूर्य महात्मा फुले ‘ पुरस्कार प्रदान……….!*

एरंडोल प्रतिनिधी – सत्यशोधक समाज संघाचे जळगाव जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र प्रभाबाई पितांबर महाजन यांना त्यांच्या उल्लेखनीय सामाजिक कार्याबद्दल २०२६ चा राज्यस्तरीय ‘क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. ‘ द युवा ग्रामीण पत्रकार संघ, महाराष्ट्र राज्य ‘ तर्फे पंढरपूर येथे आयोजित ‘महाराष्ट्र गौरव सन्मान’ सोहळ्यात संत सावता महाराज यांचे १९ वे वंशज ह.भ.प. सावता महाराज वसेकर यांच्या शुभहस्ते हा सन्मान प्रदान करण्यात आला.सत्यशोधक विचारांचा वारसा पुढे नेल्याबद्दल आणि उपेक्षित घटकांसाठी केलेल्या योगदानाबद्दल त्यांना हा बहुमान मिळाला.
याप्रसंगी व्यासपीठावर पंढरपूर नगरीच्या नगराध्यक्षा प्रणिती भालके, पोलीस निरीक्षक दशरथ वाघमोडे, व्याख्याते अन्सार शेख, अनिता शिंदे,वनरक्षक अधिकारी अशोक ढाकणे हे मान्यवर उपस्थित होते.
तसेच प्रणव परिचारक, संतोष लांडे, शकील मणियार, रूपाली सावंत, बाळासाहेब पाटोळे,मंगला सासवडे यांसह राजकीय व सामाजिक क्षेत्रातील दिग्गज उपस्थित होते.
” हा पुरस्कार समाजाप्रती असलेल्या जबाबदारीची जाणीव करून देणारा आहे,” अशा भावना रवींद्र महाजन यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या.रवींद्र महाजन यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत आहे.
