- *एरंडोल येथील सामाजिक कार्यकर्ते आनंद दाभाडे यांच्या वाढदिवसानिमित्त एरंडोल शहरासाठी रूग्णवाहिकेचे उत्साहात लोकार्पण……….!*
एरंडोल प्रतिनिधी – येथील नगरपालिकेचे प्रभाग क्रमांक ३ मधील महिला नगरसेविका तथा सामाजिक कार्यकर्त्या छायाताई आनंद दाभाडे यांच्या संकल्पनेतून त्यांचे पती तथा सामाजिक कार्यकर्ते आनंदभाऊ दाभाडे यांच्या वाढदिवसानिमित्त एरंडोल शहरवासीयांसाठी मोफत रूग्णवाहिकेचे लोकार्पण उत्साहात पार पडले.विशेष हे की नगरपालिका निवडणुकीत दाभाडे परिवाराने मतदारांना दिलेल्या आश्वासनाची पुर्तता कृतीतून पुर्ण केली.या अवघ्या तीन महिन्यांच्या कालावधीत सदर रूग्णवाहिका सेवा पुरविण्यात आली आहे.या कार्यक्रमासाठी आमदार अमोल चिमणराव पाटील व त्यांच्या धर्मपत्नी मृणालताई पाटील, नगराध्यक्ष डॉ. नरेंद्र ठाकूर, गटनेते प्रा.मनोज पाटील,जि.प.चे माजी उपाध्यक्ष ज्ञानेश्वर आमले,शिवसेना जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी माजी उपनगराध्यक्ष शालिग्राम गायकवाड, विद्यमान उपनगराध्यक्ष सुनिताताई माळी,अस्लम पिंजारी, माजी नगरसेवक पापा दाभाडे, सुरेश दाभाडे, नगरसेवक अमोल तंबोली व नगरसेवक अनिल महाजन, नगरसेविका आरती महाजन, गोपाळ पाटील,आनंदभाऊ दाभाडे, छाया दाभाडे आदी मान्यवर उपस्थित होते.
वाढदिवसानिमित्त दाभाडे यांनी इतर खर्चाला फाटा देऊन सामाजिक बांधिलकी जपत एक नवा समाजोपयोगी आदर्श एरंडोलवासियांसमोर उभा केला आहे.त्यांच्या या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत करण्यात येत आहे.

