-
*एरंडोलमध्ये क्रांतीसूर्य महात्मा फुले यांची १९९ वी जयंती उत्साहात साजरी…….!*
*भव्य दुचाकी रॅली, रक्तदान शिबिर आणि सवाद्य मिरवणुकीने शहर दुमदुमले, ६५ दात्यांचे रक्तदान……..!*
एरंडोल प्रतिनिधी – क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची १९९ वी जयंती एरंडोल शहरात अत्यंत उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात साजरी करण्यात आली. विविध सामाजिक उपक्रम, घोषणांचा जयघोष आणि भव्य मिरवणुकीने संपूर्ण शहर परिसर ‘ जय ज्योती-जय क्रांती ‘ च्या घोषणांनी दुमदुमून गेला होता.कार्यक्रमाची सुरुवात महात्मा फुले यांच्या पुतळ्याला मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण करून करण्यात आली. यानंतर शहरातील हजारो युवकांनी एकत्र येत भव्य मोटरसायकल रॅली काढली. या रॅलीद्वारे शहरातील सर्व महापुरुषांच्या पुतळ्यांना अभिवादन करण्यात आले. युवकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे रॅली आकर्षणाचे केंद्र ठरली.
याप्रसंगी महात्मा फुले पुतळा चौक येथे महात्मा फुले युवा क्रांती मंचच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात ६५ रक्तदात्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून आपली सामाजिक जबाबदारी पार पाडली. विशेष म्हणजे, उपनगराध्यक्ष सुनीता माळी आणि नगरसेविका आरती महाजन यांनी स्वतः रक्तदान करून महिलांसमोर एक आदर्श ठेवला.
या सोहळ्याला एरंडोलमधील राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील दिग्गजांची उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांनी महात्मा फुले यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकून त्यांच्या विचारांची आजच्या काळात असलेली गरज अधोरेखित केली.
या कार्यक्रमास नगराध्यक्ष डॉ. नरेंद्र ठाकूर,उपनगराध्यक्षा सुनीता माळी,शिवसेनेचे गटनेते नगरसेवक प्रा. मनोज पाटील,माजी नगराध्यक्ष देविदास महाजन,अमित पाटील (अध्यक्ष,यशवंतराव चव्हाण शिक्षण प्रसारक मंडळ),विजय महाजन (अध्यक्ष,सावता माळी शिक्षण प्रसारक मंडळ), सामाजिक कार्यकर्ते शालिग्राम गायकवाड, अरुण माळी (निवृत्त तहसीलदार), जगदीश पाटील (शिवसेना), किशोर निंबाळकर,माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी,माजी नगराध्यक्ष दशरथ महाजन, शोभाताई महाजन,उपनगराध्यक्ष सुनीता माळी,माजी नगरसेवक रुपेश माळी, नगरसेविका आरती महाजन,नगरसेवक अनिल महाजन, मयूर महाजन, रवींद्र महाजन,योगेश महाजन,ईश्वर बिऱ्हाडे (राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष) पी. जी. चौधरी सर, जी. आर. महाजन सर, आय. जी. माळी सर,कैलास महाजन (संस्थापक अध्यक्ष, युवा क्रांती मंच) व इतर अनेक मान्यवर पदाधिकारी,प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
सायंकाळी महात्मा फुले चौकापासून शहरातील मुख्य बाजारपेठ आणि प्रमुख रस्त्यांवरून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि क्रांतीसूर्याचा जयघोष करत या कार्यक्रमाची सांगता झाली.
या सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी महात्मा फुले युवा क्रांती मंचचे अध्यक्ष राहुल माळी, उपाध्यक्ष सागर पाटील, सचिव भावेश महाजन यांच्यासह गणेश महाजन, सचिन माळी, समाधान महाजन, कमलेश महाजन, नितीन महाजन आणि मंचच्या सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

