Home » सरकारी » शेकऱ्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देत कोणतीही टाळाटाळ न करता सर्व कामे वेळेत पूर्ण करा – आमदार मा.अमोलदादा पाटील यांनी दिले निर्देश

शेकऱ्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देत कोणतीही टाळाटाळ न करता सर्व कामे वेळेत पूर्ण करा – आमदार मा.अमोलदादा पाटील यांनी दिले निर्देश 

  1. शेकऱ्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देत कोणतीही टाळाटाळ न करता सर्व कामे वेळेत पूर्ण करा – आमदार मा.अमोलदादा पाटील यांनी दिले निर्देश

    पारोळा  प्रतिनिधी – येथे दिनांक २२ एप्रिल, २०२६ रोजी “मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना” संदर्भात एरंडोल विधानसभा क्षेत्रस्तरीय समितीची महत्त्वपूर्ण बैठक आमदार.अमोलदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली तहसील कार्यालय, पारोळा येथे यशस्वीरित्या पार पडली.

    या बैठकीत उपविभागीय अधिकारी मनिषजी गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक मेटे , पारोळा तहसिलदार डॉ.उल्हास देवरे, तहसिलदार गोपाल पाटील, पारोळा तालुका कृषि अधिकारी दिपक आहेर, एरंडोल तालुका कृषि अधिकारी अरविंद शिवदे, एरंडोल गटविकासअधिकारी दादाजी जाधव, पारोळा गटविकासअधिकारी भूषण कदम, एरंडोल पंचायत समितीचे मा.सभापती अनिलभाऊ महाजन, पारोळा तालुकाप्रमुख मधुकरआबा पाटील, बाजार समितीचे संचालक किरण पाटील, विटनेर येथील प्रकाश पाटील यांचेसह संबंधित सर्व प्रशासकीय अधिकारी, महसूल, कृषि व पंचायत विभागाचे अधिकारी, तसेच स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या शेत/पाणंद रस्त्यांच्या अडचणी, प्रलंबित कामे आणि अंमलबजावणीतील अडथळे यांचा सखोल आढावा यावेळी आमदार महोदयांनी घेतला.

    बैठकीत शेतकऱ्यांचे शेत रस्ते तात्काळ मोकळे करून देण्यासाठी अधिकाऱ्यांनी प्राधान्याने कार्यवाही करावी, ज्या ठिकाणी शेत रस्त्यांवर अतिक्रमण झाले आहे, ते नियमानुसार हटवून शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचा मार्ग उपलब्ध करून द्यावा, प्रलंबित प्रस्तावांना गती देऊन मंजुरी व प्रत्यक्ष काम सुरू करण्यासाठी वेळमर्यादा निश्चित करण्यात यावी, प्रत्येक गावातील शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणींची प्रत्यक्ष पाहणी करून त्यावर त्वरित उपाययोजना करावी, योजनेंतर्गत कामांमध्ये पारदर्शकता राखत गुणवत्तापूर्ण कामे पूर्ण करण्याचे निर्देश देण्यासह वरील बाबींवर विशेष भर देण्यात आली.

    या बैठकीत आमदार मा.अमोलदादा पाटील यांनी स्पष्टपणे निर्देश दिले की, शेकऱ्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देत कोणतीही टाळाटाळ न करता सर्व कामे वेळेत पूर्ण केली जावीत. शेतकऱ्यांच्या शेतीपर्यंत पोहोचण्यासाठी सुकर व कायमस्वरूपी रस्ते उपलब्ध होणे ही काळाची गरज आहे आणि यासाठी प्रशासनाने जबाबदारीने काम करणे अपेक्षित आहे.

    ही योजना ग्रामीण विकासासाठी अत्यंत उपयुक्त ठरणारी असून शेतकऱ्यांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडवून आणणारी आहे. शासनाच्या या महत्त्वाकांक्षी योजनेचा लाभ प्रत्येक पात्र शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याचा निर्धार या बैठकीत केला.

    शेतकरी बांधवांचे प्रश्न सोडवणे आणि त्यांच्या विकासासाठी कटिबद्ध राहणे हीच माझी प्राथमिकता असून, यासाठी पुढील काळातही अशा आढावा बैठका सातत्याने घेत राहणार असल्याचे आमदार महोदयांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

HUF Registration Services In India
मनोरंजन
संबंधित बातम्या