-
*एरंडोलच्या तहसीलदारांवर अवैध मुरूम कारवाईदरम्यान हल्ला, ३ जणांवर गुन्हा दाखल…………..!*
*अवैध मुरूम वाहतूक रोखणाऱ्या महसूल पथकाला शिवीगाळ व धमकी; राहुल महाजनसह तिघांवर महसूल कायद्यांतर्गत गुन्हा………….!*
एरंडोल प्रतिनिधी – शहरात अवैध गौण खनिज (मुरूम) ची चोरटी वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करणाऱ्या महसूल पथकावर हल्ला करून शासकीय कामात अडथळा आणल्याची गंभीर घटना घडली आहे. याप्रकरणी एरंडोलचे तहसीलदार गोपाळ पाटील यांना शिवीगाळ व धमकी दिल्याप्रकरणी तिघांविरोधात एरंडोल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोमवारी २७ जुलै २०२६ रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास जुना धरणगाव रस्त्यावर तहसीलदार गोपाळ पाटील हे पथकासह गस्त घालत होते. बिर्ला साडी सेंटर ते बद्री विद्या नगर कमानीदरम्यान एक ट्रॅक्टर विनापरवाना अवैध मुरूमाची वाहतूक करताना आढळला. महसूल पथकाने ट्रॅक्टर थांबवून कायदेशीर कारवाई सुरू केली.
त्याचवेळी चालक नितीन महाजन आणि राहुल रवींद्र महाजन (दोघे रा. एरंडोल) तेथे आले. त्यांनी कारवाईत हस्तक्षेप करत तहसीलदार गोपाळ पाटील यांच्याशी हुज्जत घातली, त्यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली आणि शासकीय कामात अडथळा निर्माण केला.
तहसीलदार गोपाळ पाटील यांच्या फिर्यादीवरून राहुल महाजन, चालक नितीन महाजन व एका अज्ञात ट्रॅक्टर चालकावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे:सध्या एरंडोल पोलीस ठाण्याचे अधिकारी या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
Home
»
महाराष्ट्र
»
*एरंडोलच्या तहसीलदारांवर अवैध मुरूम कारवाईदरम्यान हल्ला, ३ जणांवर गुन्हा दाखल…………..!*अवैध मुरूम वाहतूक रोखणाऱ्या महसूल पथकाला शिवीगाळ व धमकी; राहुल महाजनसह तिघांवर महसूल कायद्यांतर्गत गुन्हा………….!*
*एरंडोलच्या तहसीलदारांवर अवैध मुरूम कारवाईदरम्यान हल्ला, ३ जणांवर गुन्हा दाखल…………..!*अवैध मुरूम वाहतूक रोखणाऱ्या महसूल पथकाला शिवीगाळ व धमकी; राहुल महाजनसह तिघांवर महसूल कायद्यांतर्गत गुन्हा………….!*
संपादक - कैलास महाजन
मनोरंजन
संबंधित बातम्या
