एरंडोल प्रतिनिधी – शासकीय विश्रामगृहावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेश संघटक अनिल महाजन यांनी येथे शुक्रवारी २७ सप्टेंबर २०२४ रोजी सायंकाळी पत्रकार परिषद घेऊन एरंडोल पारोळा विधानसभा मतदारसंघात ‘ मी पक्षश्रेष्ठींकडे उमेदवारीसाठी प्रबळ दावेदारी केली असल्याचे ‘ घोषित केले आहे.
यावेळी अनिल महाजन यांनी एरंडोल पारोळा तालुक्याचा औद्योगिक विकास करण्याचा आपला मानस असून या माध्यमातून अनेक युवक, युवती व महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा माझा अजेंडा असल्याचे अनिल महाजन यांनी सांगितले.यावेळी मतदार संघात परिवर्तनाचे वारे वाहत असून जनता विकास करणाऱ्या उमेदवाराला संधी देऊन परिवर्तन घडवून आणेल.असा दावा करण्यात आला.
