रावेर तालुक्यातील सावदा परिसरात जुगार अड्डयावाल्यांचे एक आठवड्यानतर पुन्हा डोके वर काढल्याने जोरदार कमाई असल्याने उठ चंदा फिर वही धंदा जुगार अड्डे जोरदार सुरू असल्याची जिल्ह्यात जोरदार चर्चा
प्रतिनिधी — जळगाव जिल्हा ब्युरो चिफ (हमीद तडवी)
रावेर तालुका हा भारतातील सर्वात जास्त केळीचे उत्पादन घेणारा तालुका म्हणुन प्रसिद्ध आहे तर सावदा शहर हे बनाना सिटी म्हणुन प्रसिद्ध आहे.शेतकरी केळी च्या पिकातून लाखों ची कमाई करतात तर त्यांच्या खालोखाल मजुर देखील हजारों रुपये रोज मजुरी कमवतात आणि ह्या सुरू असलेल्या जुगार अड्यांमधे जाऊन गमवतात. हे जुगार अड्डे कुठ पर्यंत सुरु राहणार याकडे मात्र सर्वाचे लक्ष लागून आहे हे जुगार अड्डे हे अनेक वर्षापासून सुरू असल्याची चर्चा आहे. याबाबत LCB पोलिसांना या जुगार अड्यांबाबत माहिती मिळाली की पोलिस खात्यातील काही पोलिस हे जुगार अड्डयावाल्यांना सतर्क करून
अडयावाल्यांना भलीमोठी मदत करीत असल्याचे चित्र दिवसेंदिवस वाढत जात आहे. आणि ह्या जिल्ह्यातील जनतेकडून असेही बोलले जात आहे की अहो पोलिस अधिकारी साहेब आमच्या परिवारातील मुलाबाळांना सुखाची भाकर खाऊ द्या. आणि सुखाचे जीवन जगु द्या. अशा ह्या जुगार अड्यांमुळे अनेक परिवारांचे संसार उध्वस्त होतांना दिसत आहे. केव्हा करणार जुगार अड्डे बंद. पोलिस प्रशासनाला या जुगार अड्यांची संपुर्ण माहिती असल्यावरही जुगार अड्डे का बंद होत नाही. ? याबाबत मात्र जिल्ह्यातील जनता आता विचारात पडली आहे.कोणता पोलिस अधिकारी या जुगार अड्डयावाल्यांना लगाम लावणार?याची मात्र जिल्ह्यातील जनता आतुरतेने वाट बघत आहे.अशी कडकडीची विनंती करीत असल्याचे जनतेकडून ऐकण्यास मिळत आहे. तरीही पोलीस प्रशासनाला काही जाग येत नसल्याचे चित्र जळगाव जिल्ह्यातील पोलिस प्रशासनानचे दिसत आहे. तसेच सावदासह आणि रावेर परिसरात देखील जुना सावदा रोडने सुरु असलेला जुगार अड्डा देखील चर्चेचा विषय बनत चालला आहे या जुगार अड्डयांमधे देखील लाखों करोड़ों ची उलाढाल होत असल्याची चर्चा जोर धरत आहे.याबाबत अधिक माहिती अशी की सावदा परिसरातील नावाजलेल्या जुगार अड्डयाची मागील महिना च्या कालावधीत मीडीया पोलिस टाईम आणि दैनिक पोलिस महानगर मधे बातमी प्रकाशित केली होती मात्र त्याचा जुगार अड्यांवर काहीही परिणाम होत नसल्याचे समजते म्हणून च तर ह्या जुगार अड्यांवर जोरदार अड्डा जोरदार कमाई सुरू असल्याने यामध्ये संबधित पोलिस प्रशासनाचा मोलाचे सहकार्य तर होत नाही न असा प्रश्न देखील उपस्थित होऊ लागला आहे आणि चर्चा परिसरात फेमस झाल्याचे दिसते.तरीही हा जुगार अड्डा बंद होत नसल्याने परिसरातील या जुगार अड्यांच्या आहारी गेलेली तरूणांना उपासमारी आणि आत्महत्या करण्याचा प्रसंग येऊ शकतो ?असा सवाल जिल्ह्यातील जनतेला खुप सतावत आहे.कोण लगाम लावणार ? या जुगार अड्यांना हा सवाल अजून गुलदस्त्यात आहे.पोलिस अधिकारी लावणार की आमदार खासदार मंत्री लावणार याकडे मात्र सर्व जिल्ह्याच्या जनतेचे लक्ष्य लागुन आहे.कि या प्रकारात तेरी भी चुप और मेरी भी चुप अशी परिस्थिति तर नाही न.असेही तालुकयासह जिल्ह्याच्या जनतेकडुन बोलले जात आहे.या जुगार अड्यावाल्यांकडुन असेही ऐकवण्यास येत आहे की भाड मे जाए जनता और अपना जुगार अड्डा तो हर रोज जमता .हे जुगार अड्डृडयावाल्यांचे उच्च अधिकारी पर्यंत धागेदोरे असल्याची जोरदार चर्चा सुरु असल्याचे जिल्ह्याच्या जनतेकडुन ऐकवण्यास मिळत आहे. तरी या संपूर्ण प्रकाराकडे पोलीस महासंचालक साहेब यांनी गांभीर्याने लक्ष देऊन जुगार अड्ड्यांपासुन तरूण मंडळी सह जुगार खेळणारांच्या परिवारांना तरी वाचवावे अशी रास्त स्वरूपाची मागणी जिल्ह्यातील जनतेकडुन आणि मीडिया पोलीस टाईम चे मुख्य संपादक तसेच ANTI CORRUPTION AND MEDIA INVESTIGATION चे महाराष्ट्र प्रदेश प्रेसिडेंट आणि भारतीय किसान संघटना चे जिल्हा अध्यक्ष हमीद तडवी यांनी देखील हे जुगार अड्डे बंद करण्याची मागणी केली आहे