Home » सामाजिक » एरंडोल येथील महामार्ग चौपदरीकरण समस्या संदर्भात नागरिक कृती समितीचे पदाधिकारी नामदार नितीन गडकरी व खासदार स्मिता वाघ यांची भेट घेणार….

एरंडोल येथील महामार्ग चौपदरीकरण समस्या संदर्भात नागरिक कृती समितीचे पदाधिकारी नामदार नितीन गडकरी व खासदार स्मिता वाघ यांची भेट घेणार….

  1. एरंडोल येथील महामार्ग चौपदरीकरण समस्या संदर्भात नागरिक कृती समितीचे पदाधिकारी नामदार नितीन गडकरी व खासदार स्मिता वाघ यांची भेट घेणार….

    एरंडोल प्रतिनिधी. :-येथे २३ डिसेंबर २०२४ रोजी दुपारी स्वामी समर्थ केंद्रात महामार्ग चौपदरीकरण समस्या निवारण नागरिक कृती समितीची बैठक माजी आमदार महेंद्रसिंग पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी अमळनेर नाका नजीकच्या हायवे क्रॉसिंग वर उड्डाणपूल, व बी एस एन एल ऑफिस जवळ अंडरपास या प्रमुख मागण्यांसह इतर मागण्यांकरिता अधिक खासदार स्मिता वाघ व नंतर नामदार नितीन गडकरी यांची भेट घेण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला. दोघ नेत्यांना भेटून चौपदरीकरणाच्या कामातील निर्माण झालेल्या समस्या सोडविण्यासाठी पाठपुरावा करावा असे ठरवण्यात आले.
    दत्त मंदिरापासून अमळनेर नाका क्रॉसिंग पर्यंत महामार्गाच्या दोन्ही बाजूला समांतर रस्ते तसेच पथदिवे, गटारी, नाक्यावर ब्लिंकीगलाईट,, आदी मागण्यांबाबत यावेळी सविस्तर चर्चा झाली.याप्रसंगी माजी नगराध्यक्ष रमेश परदेशी, माजी नगराध्यक्ष देविदास महाजन, रमेश महाजन, माजी नगराध्यक्ष दशरथ महाजन व राजेंद्र चौधरी, विजय महाजन, गोरख चौधरी, पंकज महाजन,  महाजन,असलम पिंजारी माजी नगराध्यक्ष रवींद्र महाजन, जगदीश ठाकुर , डॉ. सुरेश पाटील आदी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

HUF Registration Services In India
मनोरंजन
संबंधित बातम्या